शिर्डी - शिर्डी ग्रामस्थ व भाविकांच्या अनेक दिवसांच्या प्रयत्नांना यश आले आहे. दर गुरूवारची साईबाबांची पालखी मिरवणूक पुन्हा साई संस्थानकडुन सुरू करण्यात आली ( Shirdi Sai baba Palkhi ) आहे. त्यामुळे साईभक्तांनी आनंदोत्सव साजरा केला आहे.
![Shirdi Sai baba Palkhi ceremony started](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-ahm-shirdi-saibabapalkhistarts-12-rtu-mh10010_12032022095801_1203f_1647059281_442.jpg)
साईबाबांच्या पालखी मिरवणुकीला जवळपास 108 वर्षांची परंपरा आहे. साईबाबांच्या काळात द्वारकामाई मंदिर ते चावडी मंदिरापर्यंत ही मिरवणूक दिवसाआड काढण्यात येत असे. बाबांच्या निर्वाणानंतर दर गुरूवारी पालखी मिरवणूक काढण्याची परंपरा सुरू झाली. ठराविक सण व उत्सवात पालखी किंवा रथाची गावातून मिरवणूक काढण्यात येते. गुरुवारी साईबाबांच्या पालखीची मिरवणूक मोठ्या उत्साहात काढण्यात आली.
कोरोना काळात साईबाबा मंदिर बंद झाल्यानंतर पालखी व रथ मिरवणुका सुद्धा थांबवण्यात आल्या. मंदिर सुरू होऊनही अनेक दिवस झाले. तरी या मिरवणुका बंदच होत्या. यासाठी शिर्डी ग्रामस्थांनी साई संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना भेटुन पालखी सुरू करण्याचे निवेदन ग्रामस्थ आणि भाविकांनी दिले होते. ग्रामस्थ आणि भाविकांची मागणी लक्षात घेऊन साई संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गुरुवारपासून साई पालखी मिरवणुकीची परंपरा पुन्हा सुरू केली आहे.
हेही वाचा - Police Transfer Corruption Case : देवेंद्र फडणवीस उद्या सकाळी बीकेसी सायबर पोलीस ठाण्यात हजर होणार