अहमदनगर - देशभर गणपती बाप्पांचे आगमन मोठ्या जोशात होत असताना, बीजमाता पद्मश्री राहीबाई सोमा पोपेरे यांनी आपल्या राहते घरी अस्सल गावठी बियाण्यांपासून बनवलेल्या गणरायांचे सुंदर प्रतीक साकारलेले आहे.( Padmashri Seedmother Rahibai ) मनोभावे पूजा करत या गणरायांची स्थापना केली आहे. गावठी बियाण्यांच्या संवर्धनातून शेतकऱ्यांसाठी मोठी चळवळ उभी करणाऱ्या बीज माता राहीबाई पोपेरे यांनी वाल, भात, नागली, वरई, भोपळा, मूग, उडीद, आबई, कारली, दोडका इत्यादी गावठी बियांचा वापर करून गणपतीची प्रतिकृती निर्माण केली आहे. निसर्ग पूरक गणपती बाप्पांची प्रतिष्ठापना करण्याचे आवाहन देशवासीयांना त्यांनी केलेले आहे.
प्रत्येक कृतीतून पर्यावरण आणि शेतकरी यांच्यासाठी कार्य प्रदूषण मुक्त व पर्यावरण युक्त गणरायांची स्थापना व गणेशोत्सव साजरे करण्याचे विनम्र आवाहन त्यांनी देशवासीयांना केलेली आहे. अत्यंत मनोभावे आणि कल्पकतेने त्यांनी अस्सल गावठी बियांचा वापर करत गणरायांची प्रतिकृती साकारलेली आहे .या गणरायांना पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केल्याचे चित्र दिसत आहे. आपण करत असलेल्या कामावर निस्सीम प्रेम व तेवढीच आदर युक्त भावना ठेवत त्यांनी या गणरायाची स्थापना केलेली आहे. प्रत्येक कृतीतून पर्यावरण आणि शेतकरी यांच्यासाठी कार्य करणाऱ्या पद्मश्री राहीबाई यांच्या कल्पनेतून साकारलेल्या या गणरायाला सर्व भाविक शेतकरी आदराचे स्थान देत आहेत.
बायफने घेतली दखल - गणराजाला सर्व समाज तसेच मुख्यत्वे शेतकरी आनंदी आणि सुखी ठेवण्याची प्रार्थना त्यांनी केली आहे. पद्मश्री राहीबाई यांच्या कार्याची दखल बायफ या आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त संस्थेने घेऊन त्यांचे काम जगापुढे नेले आहे. संस्थेचे रिजनल डायरेक्टर व्हीं.बी. द्यासा तसेच राज्य समन्वयक सुधीर वागळे यांनी सर्व गणेश भक्तांना बीजरुपी निसर्गमय शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत
हेही वाचा - Paola Maino: काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींच्या आईचे निधन; वाचा, कुटुंबाविषयी सविस्तर