ETV Bharat / state

विशाखापट्टणमहून रेल्वेने आणलेला ऑक्सिजन अहमदनगरला पोहोचला, जिल्ह्यात उतरवले दोन टॅंकर - अहमदनगर जिल्हा लेटेस्ट न्यूज

राज्यासह अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. यातील अनेकांना ऑक्सिजनची गरज भासत असल्याने ऑक्सिजनचा तुटवडा जाणवू लागला आहे. या पार्श्वभूमीवर विशाखापट्टणमहून रेल्वेने 8 टॅंकर ऑक्सिजन राज्यात आणला गेला. यातील दोन ऑक्सिजनचे टॅंकर हे जिल्ह्यात उतरून घेण्यात आले. या टॅंकरमध्ये प्रत्येकी दहा टन ऑक्सिजन आहे.

विशाखापट्टणमहून रेल्वेने आणलेला ऑक्सिजन अहमदनगरला पोहोचला

author img

By

Published : Apr 24, 2021, 9:33 PM IST

अहमदनगर - राज्यासह जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. यातील अनेकांना ऑक्सिजनची गरज भासत असल्याने ऑक्सिजनचा तुटवडा जाणवू लागला आहे. या पार्श्वभूमीवर विशाखापट्टणमहून रेल्वेने 8 टॅंकर ऑक्सिजन राज्यात आणला गेला. यातील दोन ऑक्सिजनचे टॅंकर हे जिल्ह्यात उतरून घेण्यात आले. या टॅंकरमध्ये प्रत्येकी दहा टन ऑक्सिजन आहे. यातील एक टॅंकर संगमनेरला तर दुसरा टॅंकर हा अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात खाली करण्यात आला. या टॅंकरमुळे जिल्ह्यातील दोन दिवसांच्या ऑक्सिजनची गरज भागणार आहे.

विशाखापट्टणमहून रेल्वेने आणलेला ऑक्सिजन अहमदनगरला पोहोचला

खासगी रुग्णालयात ऑक्सिजनचा तुटवडा

जिल्ह्यातील सर्वाधिक रुग्ण हे अहमदनगर शहरात उपचार घेत आहेत. यातील जवळपास अर्ध्ये रुग्ण हे खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. खासगी रुग्णालयात उपचार घेणारे अनेक रुग्ण हे गंभीर असल्याने, त्यांना ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात गरज आहे. मात्र असे असताना खासगी रुग्णालयांनी ऑक्सिजनची सोय त्यांच्या पातळीवर करावी असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत. त्यामुळे खासगी रुग्णालयाविरोधात शासकीय रुग्णालये असा वाद उभा राहिला आहे. शासकीय रुग्णालयात शिल्लक राहिलेला ऑक्सिजनचा साठा हा खासगी रुग्णालयांना पुरवला जातो. तसेच अहमदनगरच्या औद्योगिक वसाहतीमधील तीन-चार प्लांटमधून पाचशे ते सहाशे ऑक्सिजन गॅस सिलिडंर मिळतात ते खरेदी करण्यासाठी खासगी रुग्णालयात स्पर्धा सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.

हेही वाचा - दिल्ली ऑक्सिजन संकट : आपत्कालीन स्थितीसाठी सरकार ठेवणार राखीव ऑक्सिजन साठा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.