ETV Bharat / state

Shirdi Saibaba : साई भक्तांनी आणलेली वस्त्रे लकी ड्रॉच्या माध्यमातून साईबाबांच्या अंगावर चढणार

author img

By

Published : Dec 30, 2022, 6:38 PM IST

Updated : Dec 30, 2022, 7:58 PM IST

शिर्डीतील साईबाबाला दान केलेले वस्त्र हे साईबाबांना परिधान करावा अशी येथे आलेल्या भाविकांची भावना असते. मात्र येथेही व्हीआयपींचा गराडा, प्रतिष्ठितांचा वशिला आणि आधिका-यांचे आरक्षण बाधा करत होते. त्यामुळे सामान्य भाविकांचे वस्त्र साईबाबांपर्यत पोहचणे ( Ordinary devotees clothes reach to Sai Baba ) अशक्य होत असे. मात्र आता साई बाबा संस्थानने साईंना वस्त्र चढवण्याच्या कार्यपद्धतीत पारदर्शता आणत सरळ लकी ड्रॉ पद्धत ( Lucky Draw Method ) सुरु केली आहे. त्यामु़ळे आता जो कोणी डोनेशन कार्यालयात वस्त्र जमा करेल त्याचा ड्रेस साईंना चढवला जात आहे.

Shirdi Saibaba
शिर्डी साईबाबा
प्रभारी सीईओ साईट्र्स्ट राहूल जाधव माहिती देताना

शिर्डी (अहमदनगर) : शिर्डीच्या साईबाबांचे देश-विदेशात कोट्यावधी भाविक आहे. त्यामुळे साईंची शिर्डी नेहमीच भाविक भक्तांनी फुलून गेलेली असते. शिर्डीत आलेले भाविक बाबांना दान ही करत असतात. कोणी सोने चांदी करतात तर कोणी रोख अणि वस्तू स्वरुपात. तर कोणी भक्त बाबांना रेशीमी आणि नक्षीदार रंगीत वस्त्र दान करतात.

शिर्डीत लकी ड्रॉ पद्धत : भाविकांची भावना असते की आपण दान केलेला ड्रेस साईंना परिधान करण्यात यावा. मात्र व्हीआयपींचा गराडा, प्रतिष्ठितांचा वशिला आणि आधिका-यांचे आरक्षण बाधा करत होते. त्यामुळे सामान्य भाविकांचे वस्त्र साईबाबां पर्यत पोहचणे अशक्य होत असे. मात्र आता साई बाबा संस्थानने साईंना वस्त्र चढवण्याच्या कार्यपद्धतीत पारदर्शता आणत सरळ लकी ड्रॉ पद्धत सुरु केलीये. त्यामु़ळे आता जो कोणी डोनेशन कार्यालयात वस्त्र जमा करेल त्याचा ड्रेस साईंना चढवला जात आहे..

सामान्यांचे दान केलेले वस्त्र पोहचत नव्हते : शिर्डीच्या साई बाबांच्या दरबारी दिवसाकाठी सरासरी 60 हजारा पेक्षा अधिक भाविक दर्शन करण्यासाठी येतात. आलेले भाविक बाबांना वस्त्राचे देखिल दान देतात. यात मुर्तीला चढवण्याची शॉल, समाधीवर शॉल, शेला, डोक्यावरील रुमाल असा संपुर्ण ड्रेस असतो. पुर्वापार साईंना ड्रेस चढवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असत. ज्याचा वशिला तोच काशिला ह्या म्हणी प्रमाणे काही मोजक्या भाविकांचे वस्त्र बाबांना चढवले जात. यात व्हीआयपी, व्हीव्हीआयपी अशा सुद्धा फिल्डींग असत. त्यामुळे सामान्य भाविकांने दिलेला ड्रेस साईमुर्ती पर्यंत सहसा पोहचत नसे. भाविकांच्या वारंवार मागणी नुसार साईसंस्थानने यात पादर्शता आणत लकी ड्रॉ पद्धत सुरु केली आहे.

अशी असेल नवीन पद्धत : ज्या भाविकांना बाबांना वस्त्र दान करायचे आहेत त्यांनी डोनेशन काऊंटर वर वस्त्र जमा करुन टोकन घ्यायचे आहे. ते टोकन सीलबंद बॉक्स मध्ये टाकवे जाते, तो बॉक्स ऑन कॅमेरा डोळ्यावर पट्टी बांधत ड्रॉ काढला जातो. यावेळी तब्बल नव्वद टोकन काढून महिनाभराची यादी जाहीर केली जाते. ज्या भाविकांची ड्रेस चढवला जाईन त्याला मेसेज व्दारा देखिल आता कळवण्यात येणार आहे.

Last Updated : Dec 30, 2022, 7:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.