अहमदनगर - नगर जिल्ह्यामध्ये आज (मंगळवार) कोरोनाचा आणखी एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. नव्याने आढळलेल्या या रुग्णाला केवळ संसर्गातून बाधा झाली आहे. त्यामुळे नगरकरांची चिंता वाढली आहे. कोरोनाची लागण झालेल्या या रुग्णावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हेही वाचा - संचारबंदी असतानाही घराबाहेर फिरणाऱ्यांना पोलिसांच्या दंडुक्यांचा प्रसाद
या अगोदर जिल्ह्यात दोन कोरोनाबाधित रुग्ण होते. त्यात आज तिसर्याची भर पडली आहे. कोरोना हा संसर्गातून फैलावत असल्याने प्रशासनाने जमावबंदी आणि संचारबंदी लागू केली आहे. नगरकर मात्र, या आदेशाचे उल्लंघन करत आहेत. आता तिसरा रुग्ण आढळल्यानंतर तरी नगरकरांनी आता स्वतःच काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.