ETV Bharat / state

Shrirampur Crime : सुरक्षा रक्षकाच्या बंदुकीतून सुटली गोळी; एकाचा मृत्यू

सुरक्षा रक्षक दशरथ कारभारी पुजारी हे बँकेबाहेरील एटीएमसमोर बसलेले असताना अचानकपणे त्यांच्या जवळील रायफलमधून गोळी सुटली; यावेळी बॅंकेत कामासाठी आलेल्या 42 वर्षीय अजित विजय जोशी यांचा सुटलेली गोळी लागल्याने मुत्यू झाला आहे.

Shrirampur Crime
घटनास्थळ
author img

By

Published : Jul 30, 2022, 8:43 PM IST

अहमदनगर - श्रीरामपूर शहरातील अहमदनगर डिस्ट्रीक्ट सेंट्रल बँकेच्या आवारात आज दुपारी 12.45 वाजेच्या सुमारास अशोक सहकारी बँकेचे अधिकारी हे सुरक्षा रक्षकासह कॅश काढण्यासाठी आले होते. दरम्यान सुरक्षा रक्षक दशरथ कारभारी पुजारी हे बँकेबाहेरील एटीएमसमोर बसलेले असताना अचानकपणे त्यांच्या जवळील रायफलमधून गोळी सुटली; यावेळी बॅंकेत कामासाठी आलेल्या 42 वर्षीय अजित विजय जोशी यांचा सुटलेली गोळी लागल्याने मुत्यू झाला आहे.

एकाचा मृत्यू - या घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, डीवायएसपी संदीप मिटके, पोलीस निरीक्षक संजय सानप पोलीस ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले होते. सदरची दुर्घटना कशी झाली याबाबत त्यांनी कसून चौकशी सुरू केली आहे. सदरची घटना शहरातील मध्यवर्ती ठिकाणी घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात बघ्यांनी गर्दी केली होती. या घटनेनंतर पोलिसांनी सुरक्षा रक्षकास विचारपूस करण्यासाठी ताब्यात घेतले आहे. मृत अजित जोशी हे प्रगतशिल शेतकरी होते. ते शहरातील वार्ड नंबर 7 मधील रहिवाशी असल्याची माहिती समोर आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.