शिर्डी (अहमदनगर) Ayodhya Ram Mandir : येत्या 22 जानेवारीला देशाच्या इतिहासातील सर्वात आनंदाचा दिवस उजाडणार आहे. कारण या दिवशी मोठ्या उत्साहात अयोध्या येथील प्रभू श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होणार आहे. या सोहळ्याची देशभरात उत्साही वातावरणात तयारी केली जात आहे. या सोहळ्यानिमित्त नुकतेच अयोध्या येथून आलेला अक्षदा कलश श्री साई समाधी मंदिरात (Shri Sai Samadhi Temple) ठेवण्यात आला. त्यानंतर शनिवारी साईबाबा संस्थानला श्रीराम मंदिर उद्घाटनाचं अधिकृत निमंत्रण देण्यात आलं आहे.
11 तास 'श्रीराम जय राम जय जय राम' नामाचा जप : अयोध्येतील या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी प्रत्येक भारतीय आपल्या परीने योगदान देत आहे. शिर्डीतील द्वारकामाई वृद्धाश्रमातील (Dwarkamai Vrudhashram) आजी आजोबांना या सोहळ्यास प्रत्यक्षरित्या जाणे शक्य होणार नसल्यानं, या आनंददायी ऐतिहासिक सोहळ्यात काहीतरी योगदान देण्याचा मानस त्यांनी केला. दररोज 11 तास "श्रीराम जय राम जय जय राम" या नामाचा अविरतपणे जप करण्यास सुरूवात केली. नाम जपातून आपल्या आराध्य दैवतेच्या चरणी आपली भक्तीसेवा देण्याचा उपक्रम शिर्डीतील वृद्ध, निराधार आजी-आजोबांनी आजपासून सुरू केल्याची माहिती, वृद्धाश्रम चालवणाऱ्या किर्तीना यांनी दिली.
पूजाविधीचा कार्यक्रम जाहीर : 22 जानेवारी रोजी होणाऱ्या श्री राम मंदिराच्या अभिषेक प्रसंगी पूजाविधीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलाय. 16 जानेवारीला ज्या झोपडीत श्री रामाची मूर्ती तयार करण्यात आलीय, तिथून पूजेला सुरुवात होणार आहे. यानंतर मूर्ती तयार करणाऱ्या कारागिराची तपश्चर्या होणार आहे. विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि धर्माचार्य संपर्क प्रमुख अशोक तिवारी यांनी सांगितलं की, 17 जानेवारी रोजी श्री विग्रहाच्या परिसराचा फेरफटका मारून गर्भगृहाचे शुद्धीकरण करण्यात येणार आहे. यानंतर १८ जानेवारीपासून रेसिडेन्सी सुरू होईल. दोन्ही वेळी जल अधिवास, सुगंधी आणि गंध अधिवास असेल. 19 जानेवारी रोजी सकाळी फळ आधिवास आणि सायंकाळी धान्य आधिवास असेल. त्याचप्रमाणं 20 जानेवारी रोजी सकाळी पुष्प अर्पण आणि सायंकाळी तुपाचा निवास असेल. तसेच प्राण प्रतिष्ठामध्ये 11 पाहुणे सहभागी होतील.
हेही वाचा -