अहमदनगर - देशभरासह राज्यात आज ७२ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. तर संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथील डी. के. मोरे जनता माध्यमिक विद्यालयात प्रजासत्ताक दिन आगळ्या-वेगळ्या पध्दतीने साजरा करण्यात आला आहे.
कोरोना महामारीच्या काळात आपले कर्तव्य चोख निभावणाऱ्या वैद्यकीय, पोलीस आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांप्रती विद्यार्थ्यांनी सद्भभावना व्यक्त केली. यासाठी मुलांनी खास बैठक रचना करत कोरोना वॉरियर्संना सलाम केला.
विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात तिरंगी सजावट
देशभरात आज ७२ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्सहात साजरा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही सकाळीच ट्विट करुन देशवासीयांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने, अखंड वारकरी संप्रदायाचे दैवत असणाऱ्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात तिरंगी रंगांमध्ये फुलांची आरास करण्यात आली आहे. झेंडू, शेवंती, स्प्रिंगर, कार्नेशियन अशा विविध फुलांचा यात वापर करण्यात आला. या सजावटीत १४६ किलो फुलांचा वापर करण्यात आला. प्रजासत्ताक दिनानिमित्ताने केलेली ही मनमोहक सजावट विठ्ठल भक्तांसाठी अनोखी भेट ठरली आहे.
हेही वाचा - 'अस्वस्थ जनतेला धीर देण्यासाठी कोरोना काळात महाराष्ट्रभर फिरलो'
हेही वाचा - पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना काळे झेंडे दाखवून निषेध