ETV Bharat / state

निलेश लंके यांचा राष्ट्रवादीत प्रवेश; विधानसभा उपाध्यक्षांसमोर उभे राहणार आव्हान

शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख निलेश लंके यांनी पारनेर येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात पक्ष प्रवेश केला. यामुळे विधानसभेचे उपाध्यक्ष विजय औटी यांच्यापुढे मोठे आव्हान उभे राहणार आहे.

निलेश लंके यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
author img

By

Published : Feb 1, 2019, 10:59 AM IST

अहमदनगर - परिवर्तन निर्धार यात्रेच्या निमित्ताने शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख निलेश लंके यांनी पारनेर येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात पक्ष प्रवेश केला. यावेळी त्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. लंके यांच्या पक्षप्रवेशामुळे गेली १० वर्षे शिवसेनेचे आमदार आणि विधानसभेचे उपाध्यक्ष विजय औटी यांच्यापुढे मोठे आव्हान उभे राहिल्याचे बोलले जात आहे. लंके शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख आहेत. आमदार औटी यांच्याशी झालेल्या मतभेदानंतर त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी पारनेर विधानसभा मतदारसंघात मोठे संघटन तयार केले आहे.

पारनेर येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार परिवर्तन यात्रेच्या निमित्ताने आयोजित मेळाव्यात मोठी गर्दी दिसून आली. यावेळी बोलताना लंके यांनी औटी यांच्याकडून तालुक्यामध्ये मोठी दहशत निर्माण केली जात असल्यामुळे पक्ष सोडल्याचे सांगितले. तसेच आता खऱ्या अर्थाने तालुक्यामध्ये परिवर्तन होणार असल्याचे मत मांडले.

मेळाव्यात बोलताना, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी चित्रफितीच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ला दिलेल्या आश्वासनांची आठवण करून दिली. या सरकारने केवळ आश्वासन देण्याशिवाय काहीही केलेले नाही. त्यामुळे आता २०१९ मध्ये जनता परिवर्तन करून पुन्हा एकदा काँग्रेस आघाडीची सत्ता येईल, असा विश्वास पाटील यांनी यावेळी व्यक्त केला. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, छगन भुजबळ आदींची यावेळी भाषणे झाली.

undefined

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, माजी मंत्री मधुकर पिचड, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके आदी नेते यावेळी उपस्थित होते.

Intro:अहमदनगर- निर्धार परिवर्तन यात्रेच्या निमित्ताने शक्ती प्रदर्शन करत निलेश लंके यांचा राष्ट्रवादी प्रवेश..

Body:mh_ahm_trimukhe_1_parner_ncp_rally_v

अहमदनगर- निर्धार परिवर्तन यात्रेच्या निमित्ताने शक्ती प्रदर्शन करत निलेश लंके यांचा राष्ट्रवादी प्रवेश..

अहमदनगर- परिवर्तन निर्धार यात्रेच्या निमित्ताने शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख निलेश लंके यांनी पारनेर येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात पक्ष प्रवेश करून जोरदार शक्तिप्रदर्शन केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, माजी मंत्री मधुकर पिचड, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके आदी नेते यावेळी उपस्थित होते. निलेश लंके यांच्या पक्षप्रवेशाच्या निमित्ताने करण्यात आलेले जोरदार शक्तिप्रदर्शन हे गेली दहा वर्षे शिवसेनेचे आमदार आणि विधानसभेचे उपाध्यक्ष विजय यांच्यापुढे त्यांनी मोठे आव्हान उभे केल्याचं बोललं जात आहे. निलेश लंके शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख असून आमदार विजय औटी यांच्याशी झालेल्या मतभेदानंतर त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले होते . त्यानंतर त्यांनी पारनेर विधानसभा मतदारसंघात मोठे संघटन तयार केले असून निर्धार परिवर्तन यात्रेच्या निमित्ताने आयोजित मेळाव्यात त्याचा प्रत्यय आला. पारनेर येथे आयोजित राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या निर्धार परिवर्तन यात्रेच्या निमित्ताने आयोजित मेळाव्यात मोठी गर्दी दिसून आली. यावेळी बोलताना निलेश लंके यांनी तालुक्यामध्ये आ. औटी यांच्या कडून तालुक्यात मोठी दहशत निर्माण केली जात असल्याने आपण पक्ष सोडल्याचे सांगत आता खऱ्या अर्थाने तालुक्यामध्ये परिवर्तन होणार असल्याचे सांगितले. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी चित्रफितीच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 दिलेल्या आश्वासनांची आठवण करून दिली या सरकारने केवळ आश्वासन देण्यात शिवाय काहीही केलेले नाही आणि त्यामुळे आता 2019 मध्ये जनता परिवर्तन करून पुन्हा एकदा काँग्रेस आघाडीची सत्ता येईल असा विश्वास पाटील यांनी यावेळी व्यक्त केला. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, छगन भुजबळ आदींची यावेळी भाषणे झाली.

-राजेंद्र त्रिमुखे, अहमदनगर.

Conclusion:अहमदनगर- निर्धार परिवर्तन यात्रेच्या निमित्ताने शक्ती प्रदर्शन करत निलेश लंके यांचा राष्ट्रवादी प्रवेश..
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.