ETV Bharat / state

अहमदनगर जिल्ह्यात आढळले नवे 185 रुग्ण; तर 40 रुग्णांची कोरोनावर मात - ahmednagar corona latest news

एकाच दिवशी तब्बल 185 इतके रुग्ण पहिल्यांदाच आढळून आले आहेत. यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या 1 हजार 340 झाली असून उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 534 आहे.

अहमदनगर कोरोना अपडेट
अहमदनगर कोरोना अपडेट
author img

By

Published : Jul 17, 2020, 10:42 AM IST

अहमदनगर - जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये सुरुवातीला 115 रुग्णांचे अहवाल बाधित आढळून आले. त्यानंतर दुपारी खासगी प्रयोगशाळेत 52 रुग्णांची नोंद झाली. तर रात्री उशिरा 18 रुग्ण आढळून आल्याने एकाच दिवशी तब्बल 185 इतके रुग्ण पहिल्यांदाच आढळून आले आहेत. यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या 1 हजार 340 झाली असून उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 534 आहे.

दरम्यान, 46 रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता 773 झाली आहे. तर आतापर्यंत 35 कोरोनाग्रस्तांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, अशी माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाडे यांनी दिली.

प्राप्त अहवालातील बाधितांमध्ये संगमनेर तालुक्यातील 11, अहमदनगर महापालिका क्षेत्रातील 16 आणि श्रीगोंदा तालुक्यातील 5 जणांचे अहवाल बाधित आढळून आले. तर दुपारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार बाधितांमध्ये पाथर्डी तालुक्यातील 10 (पाथर्डी शहर 8, कोल्हूबाई कोल्हार 2), भिंगार येथील 2, नगर तालुक्यातील 1 (घोसपुरी) आणि राहुरी तालुक्यातील 4 (राहुरी फॅक्टरी 3, म्हैसगाव 1) जणांचे अहवाल बाधित आढळून आले.

सायंकाळी 65 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले. यामध्ये पारनेर 4 (सिध्देश्वर वाडी 3, खडक वाडी 1) पाथर्डी 32 (आगासखांड 2, कोल्हुबाई कोल्हार 9, तिसगाव 3, त्रिभुवनवाडी 4, खाटीक गल्ली पाथर्डी 14) , कोपरगाव 8 (सूरेगाव), नेवासा 1 (शिरसगाव), नगर ग्रामीण 13, (नागापूर 2, पोखर्डी 8 , देऊळगाव 1, सांड सांडवा 2 ), नगर शहर 2, जामखेड 3 (दिघोळ 2, लहाने वाडी 1) आणि श्रीगोंदा 1 (घोगरगाव), संगमनेर खुर्द 1, अशा रुग्णांचा समावेश आहे.

रात्री उशिरा आणखी 18 जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे. त्यामुळे आज दिवभरात कोरोना संसर्ग झाल्याचा आकडा 185 वर पोहोचला आहे. रात्री उशिरा प्राप्त झालेल्या 18 अहवालांमध्ये नगर शहरातील 05, संगरमनेरमधील 12, आणि अकोले तालुक्यातील एक जण आहे. नगर शहरात आढळले रुग्ण सावेडीतील भिस्तबाग आणि सातभाईमळा येथील आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.