ETV Bharat / state

विरोधकांच्या माध्यमातून राष्ट्रवादीची पिचड यांना शह देण्याची तयारी - Zilla Parishad member Kiran Lahmte enters ncp

पिचड यांनी आता पवारांची साथ सोडत भाजपचा झेंडा हाती धरला आहे. त्यामुळे अकोले तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद कमी झाल्याचे वाटत होते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसनेही आता निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर पिचड विरोधकांची एकत्र मुठ बांधली आहे.

अकोले तालुक्यातील भाजप नेत्यांचे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश होतानाचे दृश्य
author img

By

Published : Sep 23, 2019, 3:52 PM IST

Updated : Sep 23, 2019, 5:30 PM IST

अहमदनगर - मधुकर पिचड हे राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून शरद पवारांबरोबर होते. मात्र पिचड यांनी आता पवारांची साथ सोडत भाजपचा झेंडा हाती धरला आहे. त्यामुळे अकोले तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद कमी झाल्याचे वाटत होते. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसनेही आता निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर पिचड विरोधकांची एकत्र मुठ बांधली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने पिचड यांच्या विरोधकांच्या माध्यमातूनच त्यांना शह देण्याची तयारी सुरु केली आहे.

अकोले तालुक्यातील भाजप नेत्यांचे राष्ट्रवादी मते प्रवेश होतानाचे दृश्य

अकोले तालुका हा आदिवासी बहूल तालुका आहे. गेल्या काही वर्षांपासून पिचड यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून राजकारण करत येथील आमदारकी भूषविले. मात्र ऐन विधानसभा निवडणुकीच्या आधी पिचड पिता-पुत्रांनी भाजपत प्रवेश केला. त्यामुळे, पिचड यांच्या विरोधात नेहमी संघर्ष करणारे अशोक भांगरे आणि किरण लहमटेसह अनेक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली होती. मात्र, आता पिचड यांना लढा देण्यासाठी सर्व पिचड विरोधकांनी एकत्र येत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

हेही वाचा- राष्ट्रवादीतील 'त्या' नेत्याची दादागिरी भविष्यात खपवून घेणार नाही - माजी महापौर कळमकर

प्रवेश करणाऱ्यांमध्ये प्रामुख्याने भाजपचे जिल्हा परिषद सदस्य किरण लहामटे आणि सदस्या सुनिता भांगरे यांचा समावेश आहे. या दोघांनी अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. दरम्यान, अकोले तालुक्यात आज राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार शक्ती प्रदर्शन केले. त्याचबरोबर, राष्ट्रवादीकडून एक मेळावा देखील घेण्यात आला आहे. या मेळाव्यात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. यावेळी पिचड पिता पुत्रांवर अनेकांनी जोरदार टिकेची झोड उठवली.

Intro:

Shirdi_Ravindra Mahale

ANCHOR_राष्ट्रवादीच्या स्थापने पासुन शरद पवारांच्या बरोबर असलेल्या मधुकर पिचडांनी त्यांची साथ सोडत भाजपाचा झेंडा हातात घेतल्या नंतर अकोले तालुक्यात राष्ट्रवादी कॉग्रेसची ताकद कमी झाली अस वाटत होत मात्र राष्ट्रवादी कॉग्रेसनेही आता निवडणुकांच्या पाश्वभुमिवर पिचड विरोधकांची एकत्र मुठ बांधत पिचडांना शह देण्याची तयारी सुरु केली आहे....

VO_आदिवासी बहुल असलेल्या अकोले तालुक्यात गेल्या काही वर्षा पासुन कॉग्रेस आणि राष्ट्रवादी कॉग्रेसच्या माध्यमातुन राजकारण करत आमदारकी मंत्रीपद भुषविले मात्र एन विधानसभा निवडणुकांच्या आधी पिचड पिता पुत्रांनी भाजपात प्रवेश केल्याने त्यांच्या विरोधात नेहमी संघर्ष करणार्या अशोक भांगरे आणि किरण लहमटें सह अनेक कार्यकरत्यांन मध्ये नाराजी पसरली होती त्या मुळे आता सर्व पिचड विरोधकांनी एकत्र येत राष्ट्रवादी कॉग्रेसमध्ये प्रवेश केलाय या प्रामुख्यांने भाजापाचे जिल्हा परीषद सदस किरण लहामटे आणि सदस्या सुनिता भांगरे यांनी अजीत पवारांच्या उपस्थीतीत प्रवेेश केलाय....अकोले तालुक्यात आज राष्ट्रवादी कॉग्रेसने जोरदार शक्ती प्रदर्शन करत एक मेळावा घेतलाय या मेळाव्यास मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती यावेळी पिचड पिता पुत्रांवर अनेकांनी जोरदाप टिकेची झोड उठवली....Body:mh_ahm_shirdi_ajit pawar_23_visuals_mh10010
Conclusion:mh_ahm_shirdi_ajit pawar_23_visuals_mh10010
Last Updated : Sep 23, 2019, 5:30 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.