ETV Bharat / state

अहमदनगर: इंधन-गॅस दरवाढ मागे घ्या; राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन - आमदार संग्राम जगताप न्यूज

इंधन आणि घरगुती गॅस दरवाढीचा निषेध म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने राज्यभर केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. याचाच भाग म्हणून अहमदनगर शहरात शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन करण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन
राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन
author img

By

Published : Jan 12, 2021, 12:48 AM IST

अहमदनगर- कोरोनाचे संकट अजून पूर्णपणे गेलेले नसताना सामान्य नागरिक आर्थिक संकटातही सापडला आहे. या परस्थितीत केंद्र सरकारने पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलसह घरगुती गॅसचे दर वाढवलेले आहेत. सरकारच्या या इंधन दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने सोमवारी आंदोलने करत दरवाढीचा निषेध करण्यात आला.

इंधन आणि घरगुती गॅस दरवाढीचा निषेध म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने राज्यभर केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. याचाच भाग म्हणून अहमदनगर शहरात शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन करण्यात आले. तसेच जवळच असलेल्या पेट्रोल पंपावर केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

हेही वाचा-पेट्रोल व डीझेल दरवाढी विरोधात राष्ट्रवादीचा "गाडी ढकलो"मोर्चा.

यावेळी बोलताना आमदार संग्राम जगताप म्हणाले की, कोरोनाच्या संकटात अनेकांचा रोजगार गेला आहे. अनेक छोटे-मोठे उद्योग बंद होऊन व्यावसायिक कर्जबाजारी झाले आहेत. कोरोनाची बाधा झाल्याने अनेकांचे मृत्यू झाल्याने अनेकांना आर्थिक झळ बसली आहे. या परिस्थितीत सरकारने केंद्र सरकारने इंधन दरवाढ केली आहे. तसेच घरगुती गॅसच्या किमती वाढविल्या आहेत. सामान्य जनतेला दिलासा देण्याऐवजी केंद्र सरकार जनतेशी अमानुष वागत आहे. त्यामुळे ही दरवाढ तातडीने मागे घ्यावी, अशी मागणी आहे.

हेही वाचा-पेट्रोलच्या किमतीचा उच्चांक; मुंबईत डिझेलचा दर ८१ रुपयांहून अधिक

दरम्यान, कोरोनाचा संसर्ग ओसरत असताना जगभरात खनिज तेलाची मागणी वाढली आहे. त्याचा परिणाम म्हणून खनिज तेलाच्या कच्च्या तेलाचे दर वाढत आहे. या दरवाढीनंतर सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे दर वाढविले आहेत. त्यामुळे सामान्यांच्या खिशाला झळ सोसावी लागत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.