ETV Bharat / state

नगर जिल्ह्यासाठी कोरोना लसीच्या 39 हजार 290 मात्रा जिल्हा परिषदेत दाखल - कोरोना लसीकरण नगर जिल्हा

नगर जिल्हा लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यासाठी सज्ज झाला असून जिल्ह्याला 39 हजार 290 मात्रा प्राप्त झाल्या आहेत. आज (बुधवारी) पहाटे साडेतीनच्या सुमारास लसीचा कंटेनर जिल्हा परिषदेत दाखल झाला. लस जिल्हा परिषदेत शित साखळी उपकरणांमध्ये ठेवण्यात आली असून येथूनच त्याचे जिल्हा शल्य चिकित्सक व मनपा स्तरावर वितरण होणार आहे. जिल्हा परिषदेत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संदीप सांगळे, डॉ.दादासाहेब साळुंके यांच्या निगराणीखाली लसीचा पहिला साठा उतरवून घेण्यात आला आहे.

अहमदनगर
अहमदनगर
author img

By

Published : Jan 13, 2021, 7:31 PM IST

अहमदनगर - देशात १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात होणार असून राज्यात सीरम इन्स्टिट्यूटकडून लसीच्या 9 लाख 63 हजार मात्रा (डोस) प्राप्त झाल्या आहेत. केंद्र शासनाच्या सूचनेनुसार त्याचे जिल्हानिहाय वाटप केले जात आहे. नगर जिल्हा लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यासाठी सज्ज झाला असून जिल्ह्याला 39 हजार 290 मात्रा प्राप्त झाल्या आहेत. आज (बुधवारी) पहाटे साडेतीनच्या सुमारास लसीचा कंटेनर जिल्हा परिषदेत दाखल झाला. लस जिल्हा परिषदेत शित साखळी उपकरणांमध्ये ठेवण्यात आली असून येथूनच त्याचे जिल्हा शल्य चिकित्सक व मनपा स्तरावर वितरण होणार आहे. जिल्हा परिषदेत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संदीप सांगळे, डॉ.दादासाहेब साळुंके यांच्या निगराणीखाली लसीचा पहिला साठा उतरवून घेण्यात आला आहे.

अहमदनगर
साठवणुकीसाठी विशेष यंत्रणा -

डॉ. सांगळे यांनी सांगितले की, दि.13 जानेवारी रोजी पहाटे साडेतीन वाजता नगर जिल्ह्यासाठी 39 हजार 290 कोविड 19 लसीच्या मात्रा प्राप्त झाल्या आहेत. राज्य कुटुंब कल्याण केंद्र, पुणे या कार्यालयामार्फत नगर जिल्ह्याला लस मिळाली असून ती 2 ते 8 अंश सेल्सियस तापमानात ठेवण्यात आली आहे. राज्यस्तरावरून केंद्रांची संख्या निश्चित झाल्यानंतर लाभार्थींच्या संख्येनुसार संबंधित केंद्रावर वितरण केले जाणार आहे. जिल्हा परिषदेतील लसीच्या साठवणुकीची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असून याठिकाणी विनित धुंदाळे, गिरीश धाडगे, किरण शेळके, सुनिल सुंबे, इमरान सय्यद या आरोग्य यंत्रणेतील कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

जिल्ह्यात २१ ठिकाणी लसीकरण केंद्र -

महापालिका हद्दीत आठ तर ग्रामीण रुग्णालयात 13 अशा एकूण 21 ठिकाणी लसीकरण केंद्र असून प्रत्येक केंद्रावर दररोज 24 जणांना लस देण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य यंत्रणेकडून देण्यात आली आहे.

याठिकाणी आहेत लसीकरण केंद्र -

जिल्हा रुग्णालय, पाथर्डी आणि कर्जत उपजिल्हा रुग्णालय, जामखेड, शेवगाव, कोपरगाव, श्रीरामपूर, राहाता, संगमनेर, अकोले, पारनेर ग्रामीण रुग्णालय, नगर शहरातील मनपाचे बाळासाहेब देशपांडे रुग्णालय, तोफखाना आरोग्य केंद्र, मुकुंदनगर आरोग्य केंद्र, केडगाव आरोग्य केंद्र आणि महात्मा फुले आरोग्य केंद्र या ठिकाणी लसीकरण करण्यात येणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.