ETV Bharat / state

बकरी ईदनिमित्त मुस्लीम बांधवांच्या वतीने पूरग्रस्त नागरिकांना मदत - flood affected people

बकरी ईद निमित्त दरवर्षी नमाज अदा झाल्यानंतर मस्जिद, दर्गा अथवा कब्रस्तानच्या कामासाठी मदतनिधी उभारला जातो. मात्र, यावर्षी राज्यातील महापूराने ग्रस्त झालेल्या भागातील नागरिकांना मदत करण्यासाठी नमाज पठणानंतर पैसे गोळा करण्यात आले. यात सुमारे 25 हजार रुपयांच्या पर्यंत निधी गोळा झाला आहे.

नागरिकांना मदत
author img

By

Published : Aug 12, 2019, 8:02 PM IST

अहमदनगर - बकरी ईदनिमित्त राहता शहरातील सर्व मुस्लीम समाज बांधवांच्या वतीने बाजार तळावरील ईदगाह मैदानात नमाज पठण करण्यात आले. यावर्षी महापुरामुळे संकटात सापडलेल्या सांगली-कोल्हापूरसह इतर भागातील पूरग्रस्त नागरिकांना मदत करण्यासाठी मुस्लीम बांधवांनी निधी गोळा केला आहे. तसेच, हा मदतनिधी शासनाकडे सुपूर्द केला जाणार असल्याचे मुस्लीम समाज बांधवांच्या वतीने यावेळी सांगण्यात आले.

बकरी ईद मुस्लीम समाजातील मोठा सण मानला जातो. या दिवशी समाजबांधव सामूहिक नमाजपठण करत असतात. राहता शहरातील सर्व मुस्लीम बांधवांनी बकरी ईदनिमित्त सोमवार सकाळी ९ वाजता बाजार तळावरील ईदगाह मैदानात नमाज पठण केले. यावेळी, समाज बांधवांनी मौलाना याहीया, मौलाना इब्राहिम, मौलाना रऊफ, मौलाना रफिक, मौलाना अल्ताफ, हाजी रफीक शहा, मौलाना हुजेफा, करीम भाई शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रार्थना केली. तसेच सांगली, सातारा, कोल्हापूरसह राज्य व देशातील पूरग्रस्तांचे संकट टाळण्यासाठी देखील प्रार्थना केली.

दरवर्षी नमाज अदा झाल्यानंतर मस्जिद, दर्गा अथवा कब्रस्तानच्या कामासाठी मदतनिधी उभारला जातो. मात्र, यावर्षी राज्यातील महापूराने ग्रस्त झालेल्या भागातील नागरिकांना मदत करण्यासाठी नमाज पठणानंतर पैसे गोळा करण्यात आले. यात सुमारे 25 हजार रुपयांच्या पर्यंत निधी गोळा झाला आहे.

हा मदतनिधी समाज बांधवांच्या वतीने शासनाकडे सुपूर्द केला जाणार आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी निधी उभारावा यासाठी हाजी मुन्नाभाई शाह, इलियास शाह, युनूसभाई पठाण, बादशहा पठाण, पत्रकार मुश्ताक शाह, अफजल शेख, एस अब्दुल शेख, सुलेमान शेख यांनी विशेष परिश्रम घेतले.

Intro:

Shirdi_Ravindra Mahale

ANCHOR_ बकरी ईद सणानिमित्त राहाता शहरातील सर्व मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने बाजार तळावरील ईदगाह मैदानात नमाज पठण करण्यात आले मुस्लिम समाज बांधवांनी यावर्षी मशिद दर्गा अथवा कब्रस्तान साठी पैसे गोळा करण्याऐवजी महापुरामुळे संकटात सापडलेल्या सांगली-कोल्हापूर सह इतर भागातील पूरग्रस्त नागरिकांना मदत करण्यासाठी गोळा केला हा मदतनिधी शासनाकडे सुपूर्द केला जाणार असल्याचे मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने यावेळी सांगण्यात आले....

VO_ बकरी ईद म्हटलं की मुस्लिम समाजातील मोठा सण मानला जातो या दिवशी सामूहिक नमाजपठण समाजबांधव करत असतात राहता शहरातील सर्व मुस्लिम समाज बांधवांनी बकरी ईद सणानिमित्त सोमवार रोजी सकाळी नऊ वाजता बाजार तळावरील ईदगाह मैदानात नमाज पठण केले यावेळी समाज बांधवांनी मौलाना याहीया मौलाना इब्राहिम मौलाना रऊफ मौलाना रफिक मौलाना अल्ताफ हाजी रफीक शहा मौलाना हुजेफा करीम भाई शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रार्थना करुन सांगली सातारा कोल्हापूर सह राज्य व देशातील पूरग्रस्तांचे संकट टाळण्यासाठी व त्यांना आरोग्य प्राप्त व्हावे म्हणून प्रार्थना केली दरवर्षी नमाज अदा झाल्यानंतर मज्जिद दर्गा अथवा कब्रस्तान च्या कामासाठी मदत निधी उभारला जातो मात्र यावर्षी राज्यातील महापुराने पूरग्रस्त असलेल्या भागातील पूरग्रस्त नागरिकांना मदत करण्यासाठी नमाज पठण नंतर पैसे गोळा करण्यात आले सुमारे 25 हजार रुपयांच्या पर्यंत हा निधी गोळा झाला आहे हा मदतनिधी शासनाकडे समाज बांधवांच्या वतीने सुपूर्द केला जाणार आहे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी निधी उभारावा यासाठी हाजी मुन्नाभाई शाह, इलियास शाह, युनूसभाई पठाण, बादशहा पठाण पत्रकार मुश्ताक शाह ,अफजल शेख, एस अब्दुल शेख, सुलेमान शेख यांनी विशेष परिश्रम घेतले....Body:mh_ahm_shirdi_muslim_help_12_visuals_bite_mh10010Conclusion:mh_ahm_shirdi_muslim_help_12_visuals_bite_mh10010
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.