ETV Bharat / state

Murder In Akole : दोघांचे भांडण, तिसऱ्याचा मृत्यू.. दांड्याने डोक्यात मारून केली हत्या - हत्या प्रकरणात आरोपीला अटक

अहमदनगर जिल्ह्यातील अकोलेत एका कारागिराची हत्या ( Craftsman Murder In Akole ) करण्यात आली आहे. दोघांमध्ये सुरु असलेले भांडण मिटवण्यासाठी मधे पडलेल्या कारागिराचा यात मृत्यू झाला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली ( Accused Arrested In Murder Case ) आहे.

दांड्याने डोक्यात मारून केली हत्या
दांड्याने डोक्यात मारून केली हत्या
author img

By

Published : Feb 5, 2022, 8:31 PM IST

शिर्डी ( अहमदनगर ) - 'दोघांचे भांडण तिसऱ्यास लाभ' या म्हणीचा उलटा प्रत्यय अकोले येथे पहावयास मिळाला. दोघांचे सुरु असलेल्या भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या सरबजीत ओमप्रकाश चौहान या कारागीराला स्वतःचा जीव गमवाव लागलाय( Craftsman Murder In Akole ). या प्रकरणी अकोले पोलिसांनी एकाला अटक केली ( Accused Arrested In Murder Case ) आहे.

दोघांचे भांडण, तिसऱ्याचा मृत्यू.. दांड्याने डोक्यात मारून केली हत्या

अशी झाली हत्या..

अकोले शहरातील खानापूर परिसरात दरवाजे तयार करणार्‍या राजू जगधारी राजभर आणि शंकर लहानू साळुंके या दोन कारागिरांमध्ये भांडण सुरु होते. दरम्यान या दोघांचे भांडण मिटवण्यासाठी गेलेला सरबजीत ओमप्रकाश चौहानला शंकर लहानू साळुंके याने लाकडी दांड्याने पाठीवर व डोक्यावर मारुन त्याला गंभीर जखमी केले. यामध्ये मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने सरबजीतचा मृत्यू झाला.

गुन्हा दाखल, आरोपी अटकेत

घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथून घुगे आदी अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. त्यानंतर मयत कारागीर सरबजीत चौहानचा मृतदेह अकोले ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलविण्यात आला. या प्रकरणी राजू जगधारी राजभर याने दिलेल्या फिर्यादीवरुन अकोले पोलिसांनी आरोपी शंकर साळुंके याच्या विरोधात 47/2022 भादंवि कलम 302, 323, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथून घुगे करीत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.