शेवगाव(अहमदनगर) - शेवगाव नगर परिषदेच्या गलथान कारभारामुळे शेवगावकरांना १०-१२ दिवसांनी पाणी प्यायला मिळत आहे, त्याचा निषेध म्हणून आज शेवगावमधील क्रांती चौकामध्ये वंचित बहुजन आघाडी, भारतीय कम्युनिस्ट पक्ष यांच्याकडून जाहीर मुंडण आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ता प्रा. किसन चव्हाण, संजय नांगरे,प्यारेलाल भाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते,
यावेळी बोलताना प्रा.किसन चव्हाण म्हणाले की, मिलबाटके खाणाऱ्या भाजपा व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना आता जनता योग्य धडा शिकवेल, धरण विशाल असू नये शेवकर यांना पाण्यासाठी हिंडावे लागते याचा निषेधही प्रा. किसन चव्हाण यांनी यावेळी केला. यावेळी सत्ताधारी नगरसेवक व राष्ट्रवादी नगरसेवक यांच्या कारभाराचा निषेध करण्यात आला. तसेच शेवगाव नगरपरिषद नगरसेवकांमधील टक्केवारी, घराणेशाही, पाणीपट्टी वसुली, या विषयावर ही त्यांनी जोरदार टिका प्यारेलाल शेख यांनी टीका केली.
गवळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संजय नागरे बोलताना म्हणाले की, शेवगाव नगरपरिषद मध्ये ६०/४० च्या राजकारणावर टीका केली, भाजपा व राष्ट्रवादी मिलीभगत करून खात आहेत, तसेच कर्मचाऱ्यांचे पगार,त्यामुळे शेवगावचे जनता योग्य तो धडा या विद्यमान नगरसेवकांना शिकवल, यावेळी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले
यावेळी स्वाभिमान शेतकरी संघटनेचे दत्ता फुंदे, कामगार संघटनेचे रमेश खरात, राजू इंगळे, सलीम हिरानी, विशाल इंगळे, अन्सार कुरेशी, लखन घोडेराव, लक्ष्मण मोरे, विश्वास हिवाळे, रतन मगर, भिमा गायकवाड, अशोक गायकवाड, रेश्मा गायकवाड, पोशांन्ना किडमिंचे, विठ्ठल गायकवाड, राजु शेख, करण मोरे, आंन्नापा गायकवाड यांनी उपस्थिती लावली होती. हे अनोखे आंदोलन पाहण्यासाठी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. पोलीस प्रशासनाच्यावतीने मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.