ETV Bharat / state

Pravin Darekar On Sanjay Raut : शिवसेना संपवण्यात राऊतांचा हात; ईडी प्रकरणावरून दरेकरांनी घेतली फिरकी - Pravin Darekar

खासदार संजय राऊतांनी शिवसेना संपवली ( MP Sanjay Raut ended Shiv Sena ) , त्यांनी बाळासाहेब ठाकरेंची ( Oath of Balasaheb Thackeray ) शपथ घेतल्यापेक्षा शरद पवारांची ( Sharad Pawar ) शपथ घ्यावी अशी टीका भाजप नेते प्रविण दरेकर ( BJP leader Pravin Darekar ) यांनी केली आहे. ते आज शिर्डीत साई समाधीचे दर्शन घेतल्यानंतर माध्यामांशी बोलत होते.

Pravin Dareka
प्रविण दरेकर
author img

By

Published : Jul 31, 2022, 6:07 PM IST

Updated : Jul 31, 2022, 6:36 PM IST

शिर्डी ( अहमदनगर ) - खासदार संजय राऊत ( MP Sanjay Raut ) म्हणतात मी शिवसेना सोडणार नाही. तुम्हाला कोण म्हणतय शिवसेना सोडा. त्यांना माझी विनंती आहे की, आपण जेवढे दिवस शिवसेनेत राहाल तेवढे लवकर शिवसेना ( MP Sanjay Raut ended Shiv Sena ) संपेल. त्याच्यामुळे आपण शिवसेना सोडू नये, तुम्ही शिवसेना ( Shiv Sena ) सोडली तर तुम्हाला भाजपमध्ये घेणार नाही, शिंदे गटात देखील घेणार नसल्याचे भाजपचे ज्येष्ठ नेते प्रविण दरेकर ( BJP leader Pravin Darekar ) यांनी म्हटले आहे. ते शिर्डीत बोलत होते.

दरेकरांनी घेतली राऊतांची फिरकी

राऊंताना भान राहिले नाही - दरेकर यांनी आज शिर्डीत येवुन साईबाबांच्या समाधीचे दर्शन ( Visited Sai Baba Samadhi ) घेतले आहे. साई दर्शनानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले की, संजय राऊत यांच्यावर सुरू असलेल्या ईडी ( ED ) चौकशी दरम्यान त्यांनी गँलरीत येऊन वर हात दाखवण्याचा मोह ते थांबवू शकत नाहीत. म्हणजे एवढे प्रसिद्धी लोलू याठिकाणी झालेले आहे. आपण काय करतोय याचे भान देखील राऊंताना राहिले नसल्याचे यावेळी दरेकर म्हणाले आहे. भाजप तर, संस्कारित पक्ष आहे. एका वेगळ्या विचारधारेवर बसलेला पक्ष आहे. त्यामुळे अशाप्रकारच्या गोष्टींना भाजप थारा देत नाही.

राऊतांनी शरद पवारांची शपथ घ्यावी - त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे ( Chief Minister Shinde ) यांनी अगदी रास्त सांगितले आहे की, अशाप्रकारच्या कोणाला वाटत असेल चौकशा सुरू आहे. तर त्यांनी अजिबात भाजप आणी मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेत येऊ नये. अशाप्रकारच्या गोष्टींना मुठमाती शिंदे यांनी वक्तव्य करुन दिली असल्याचे त्यांनी म्हटले. बाळासाहेब ठाकरे यांची शप्पथ घेण्याचा नैतिक अधिकार संजय राऊतांना उरला आहे की नाही हा खरा प्रश्न आहे. शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी सांगितले की, तुम्ही बाळासाहेबांची विचारधारा, तत्व यांना मुठमाती कधीच दिली आहे. आपण शरद पवार यांची विचारधारा स्विकारली असल्याने संजय राऊत यांना शप्पथ घ्यायची असेल तर, शरद पवार यांची घ्या असा, सल्ला शिवसेनेचे जेष्ठ नेते रामदास कदम यांनी सल्ला दिला आहे.

हेही वाचा - MP Sanjay Raut: शिवसेना नेते संजय राऊत अखेर ईडीच्या ताब्यात; शिवसैनिक आक्रमक

राऊतांनी शिवसेना संपवली - राऊत यांनी बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना संपवली. खरं म्हणजे मोठे पाप संजय राऊत त्यांच्या हातून घडले आहे. बाळासाहेब यांची शिवसेना संपवण्यामध्ये त्यांचा हात असतांना त्याच बाळासाहेब यांची शप्पथ घ्यायची यापेक्षा नौटंकी राजकारण काय असू शकते असा सवालही दरेकर यांनी उपस्थित केला. अडीच वर्षाच्या कालावधीनंतर एक चांगले महाराष्ट्राचे हित जपणारे शिंदे-फडणवीस सरकार आले आहे. राजकारणापलीकडे जाऊन राज्यात अनेक प्रश्न आहे. राज्याच्या विकासाचे प्रश्न अडीच वर्षापासून प्रलंबित आहेत. त्यामुळे सर्व समाजघटकांना न्याय मिळेल असे दरेकर म्हणाले.

मराठा समाजाच्या प्रश्नाबाबत सरकार सकारत्मक - महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास होईल यासाठी शिंदे-फडणवीस ( Shinde Fadnavis Govt ) यांना साईबाबांचे आशिर्वाद लाभावे. त्यांच्या माध्यमातून हा महाराष्ट्र देशामध्ये सर्वोत्तम राज्य व्हावे, अशी साईचरणी प्रार्थना केली असल्याचे दरेकर यांनी सांगितले आहे. मराठा समाजाचा विषय माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मार्गी लावला होता. कोर्टात टिकला होता. मात्र या लोकांच्या निष्क्रियतेमुळे मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांचे आरक्षण गेले असून शंभर टक्के मराठा समाजाच्या सर्व प्रश्नांसंदर्भात आमचे सरकार सकारात्मक असून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे दोघेही यातून लवकरच मार्ग काढतील अशी प्रतिक्रिया प्रविण दरेकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना व्यक्त केली.

हेही वाचा - CM Eknath Shinde On Sanjay Raut : ईडीने संजय राऊतांवर केलेल्या कारवाईवर मुख्यमंत्री म्हणाले 'कर नाही त्याला डर कशाला'

Last Updated : Jul 31, 2022, 6:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.