अहमदनगर - तुम्हाला पैशांची गरज आहे. तुम्ही तुमच्या मोबाइलवर ॲप डाउनलोड ( Cheat app Download on Mobile ) करुन कर्ज घेताय? मग जरा सावधानगीरी बाळगा. तुमचे आणि कुटुंबीयांचे फोटो वापरुन तुम्हाला ब्लँकमेल केल जावू शकते. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरमध्ये असाच प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणाचा सायबर क्राईमनुसार ( Cyber Crime Investigation ) तपास सुरु झाला आहे.
काय आहे प्रकार?
संगमनेर शहरातील एका व्यक्तीला व्यवसाय वाढीसाठी कर्ज हवे असल्याने त्याला कोणी तरी मोबाइलवरुन एक ॲप डाउनलोड करत त्याद्वारे सहजगता कर्ज मिळते, असे सांगितले. त्या व्यावसायिकाने ॲप डाउनलोड केला. आपली वैयक्तीक माहीती भरुन त्यांनी सांगीतलेल्या अलाऊ बटनवर क्लिक करुन वेळो वेळी कर्ज घेतले. ते फोडलेही. मात्र कोरोनामुळे लागलेल्या दुसऱ्या लॉकडाउनमुळे त्याने घेतलेले तीस हजार रुपयाचे कर्ज फेडू शकला नाही. कर्ज देणाऱ्या सबंधित ॲपवरुन त्याने कर्जवाढीची मुदत मागितली. दरम्यान त्यांच्या तगाद्यानंतर पैशाच्या जुळवा जुळवीनंतर थकीत कर्जाचे सेटलमेंट करु, असा त्यांना मेल आला. तेथूनच त्यांची फसगत आणि मनस्ताप सुरु झाला. कर्ज फेडण्यासाठी त्यांना एका ॲपची लिंक देवून पैसे वळते करण्यासाठी सांगितले. त्यांनी पैसे भरले. मात्र त्याच दरम्यान व्हाटस ॲप व्हाईस कॉलद्वारे त्यांना दमबाजी करत धमकी येण्यास सुरूवात झाली. एक दिवस तर थेट त्यांनी दिलेल्या नातावाईकाच्या आणि काही मित्रांच्या मोबाइलवर कर्ज घेतलेल्यांच्या घराच्या महिलांचे अश्लीत फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यानंतर व्यावयिकाने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांचे आवाहन
ऑनलाइन त्वरित कर्ज देणाऱ्या ॲपपासून सर्वांनी सावध राहणे गरजेचे आहे. अशा ॲपच्या माध्यमातून थोडी फार रक्कम मिळते. परंतु त्या रकमेचा परतावा खूप अधिक असतो. तसेच ते कर्ज घेण्यासाठी ऑनलाइन दिलेल्या कागदपत्रांचा गैरवापर केला जातो. कर्जाची रक्कम मोठ्या व्याजासहित वेळेत परत न केल्यास संबंधित ॲपकडून बदनामी केली जाते. फोटोंचा गैरवापर करून बदनामी केल्याचे प्रकार समोर आले आहेत. शक्यतो हे ॲप वापरणे टाळावे, अशी काही घटना घडल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
हेही वाचा - जेवर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे भूमिपूजन करणार पंतप्रधान नरेंद्र मोदी