ETV Bharat / state

मनसेचे शरद पवार दौऱ्यात अहमदनगरमध्ये 'लाव रे तो बॅनर' आंदोलन - Ahmednagar MNS news

रविवारी (दि. 24 जाने.) शरद पवार अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी मनसेच्या वतीनी लाव रे तो बॅनर आंदोलन करण्यात येणार आहे. कोरोना काळात खासगी रुग्णालयांनी रुग्णांकडून जादा पैसे उकळले असून ती रक्कम परत मिळवून द्या, या मागणीचे निवेदनही मनसैनिक शरद पवारांना देणार आहेत.

बॅनर
बॅनर
author img

By

Published : Jan 23, 2021, 5:05 PM IST

Updated : Jan 23, 2021, 5:18 PM IST

अहमदनगर- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने उद्या (रविवार) नियोजित दौऱ्यात शरद पवारांना 'लाव रे तो बॅनर'या पद्धतीने आंदोलन छेडण्यात येणार आहे. 'पवार साहेब गोरगरीब खासगी रुग्णालयाने कोरोनाकाळात लुटमार केलेल्या वाढीव बिलांची रक्कम मिळवून द्या', असे बॅनर लावले जाणार आहेत.

बोलताना मनसे शहर प्रमुख

शरद पवार उद्या अहमदनगर जिल्ह्यात

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे 24 जानेवारीला अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर असून भंडारदरा आणि नगर शहरात त्यांची विविध कार्यक्रमांना उपस्थिती आहे. मात्र, याचवेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नगर शहरात पवारांच्या प्रवास मार्गावर कोरोनाची वाढीव बिले रुग्णांना परत मिळावी, यासाठी बॅनरबाजी करत आंदोलन करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे अहमदनगर शहरात पवार ज्या रुग्णालयाच्या कार्यक्रमास येत आहेत, त्या रुग्णालयावर सुद्धा कोरोना रुग्णांना वाढीव बिल दिल्याचा ठपका आहे. मात्र, या रुग्णालयानेही इतर रुग्णालया प्रमाणे रुग्णांना परतावा केलेला नाही..

महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने कोरोना काळातील खासगी रुग्णालयातील उपचार घेतलेल्या रुग्णांची वाढीव बिलांची रक्कम परत मिळावी त्यासाठी निवेदन देण्यात आली. आंदोलन करण्यात आली. उपजिल्हाधीकरी यांच्या समितीने संपूर्ण बिलांचे ऑडीट करुन आतापर्यंत 14 ते 15 खासगी रुग्णालयांकडून जवळपास एक कोटी रुपयांच्या वसुलीचे आदेश महानगरपालिकला देण्यात आले. हे पैसे संबधित रुग्णांच्या बँक खात्यावर जमा करावे, असे आदेश महानगरपालिका आयुक्तांनी, आरोग्य अधिकारी यांनी या सर्व रुग्णालयांना दिले. पण, यासर्व रुग्णालयांनी या आदेशला केराची टोपली दाखवली. आजपर्यंत महानगरपालिकेनेही वाढीव बिलांची रक्कम परत न दिल्यामुळे कुठल्याही प्रकारची कारवाई या संबधित रुग्णालयांवर केली नाही. मनसेच्या वतीने वारंवार मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, पालकमंत्री यांना निवेदन पाठविले. पण, कुणीही या जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष दिले नसल्यामुळे रविवारी महाविकास आघाडीचे नते येत असल्याने मनसेचे शिष्टमंडळ शरद पवारांना भेटून या संदर्भात निवेदनही देणार आहेत, अशी माहीती मनसेचे जिल्हासचिव नितीन भुतारे यांनी दिली आहे.

Last Updated : Jan 23, 2021, 5:18 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.