ETV Bharat / state

विखे आणि थोरात यांचा एकाच विमानातून दिल्ली वारी....

बाळासाहेब थोरात सोमवारी सकाळी शिर्डी विमानतळावरून साडेदहा वाजताच्या विमानाने दिल्लीकडे रवाना झाले आहे. प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर आ. थोरात यांचा हा पहिलाच दिल्ली दौरा आहे. केंद्रीय नेत्यांशी त्यांची बैठक होणार आहे. तसेच ते सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेणार आहेत.

विखे आणि थोरात
author img

By

Published : Jul 15, 2019, 3:46 PM IST

अहमदनगर- काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात आणि भाजपचे खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी सोमवारी सकाळी शिर्डी ते दिल्ली प्रवास योगायोगाने एकाच विमानाने केला. त्याचबरोबर ते एकमेकाच्या शेजारी बसल्याचे पाहून त्यांच्या कार्यकर्त्यांच्या भूवया उंचावल्या होत्या. त्यांच्या या प्रवासाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.

बाळासाहेब थोरात सोमवारी सकाळी शिर्डी विमानतळावरून साडेदहा वाजताच्या विमानाने दिल्लीकडे रवाना झाले आहे. प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर आ. थोरात यांचा हा पहिलाच दिल्ली दौरा आहे. केंद्रीय नेत्यांशी त्यांची बैठक होणार आहे. तसेच ते सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेणार आहेत. तर खा. विखे आपल्या नियोजित कामांसाठी दिल्लीकडे रवाना होणार होते. योगायोगाने सोमवारी सकाळी दोघांनी एकाच विमानातून प्रवास केला. विशेष म्हणजे प्रवास सुरू होण्याआधी दोघांना एकमेकांच्या शेजारी बसलेले पाहून त्यांच्या कार्यकर्त्यांच्या भूवया उंचावल्या होत्या. यावेळेस काहींनी या दोघांचे छायाचित्र देखील काढण्याचा प्रयत्न केला होता.

थोरात आणि विखे एकमेकांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जातात. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडूकीत त्यांनी एकमेकांविरोधात आरोपांची राळ उडवली होती. दोघांचा संपूर्ण प्रवास शेजारी बसून झाला की नाही? या दोघात प्रवासादरम्यान काय राजकीय चर्चा झाली? याची माहिती समजू शकली नाही. मात्र त्यांचे एकसाथ प्रवास केल्याचे छायाचित्र पुढे आल्याने राजकीय वर्तुळात या दोघांबद्दल चांगलीच चर्चा रंगली आहे.

Intro:

Shirdi_Ravindra Mahale

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ.बाळासाहेब थोरात आणि भाजपाचे खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी सोमवारी सकाळी शिर्डी ते दिल्ली प्रवास योगायोगानेएकाच विमानाने केला.त्यांच्या या प्रवासाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे....

सोमवारी सकाळी शिर्डी विमानतळावरून सकाळी साडेदहा वाजताच्या विमानाने ते दिल्लीकडे रवाना झाले. प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर आ.थोरात यांचा हा पहिलाच दिल्ली दौरा आहे. केंद्रीय नेत्यांशी त्यांची बैठक आहे. तसेच ते सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेणार आहेत. तर खा.विखे आपल्या नियोजित कामांसाठी दिल्लीकडे रवाना झाले.
सोमवारी सकाळी दोघांनी एकाच विमानातून प्रवास केला. विशेष म्हणजे प्रवास सुरू होण्याआधी दोघे शेजारीशेजारी बसलेले पाहून त्यांच्या कार्यकर्त्यांच्या भूवया उंचावल्या. काहींनी त्यांचे छायाचित्र कैद करण्याचा प्रयत्न केला....

थोरात आणि विखे एकमेकांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जातात. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडूकीत त्यांनी एकमेकांविरोधात आरोपांची राळ उडवली होती..दोघांनी संपूर्ण प्रवास शेजारी बसूनच झाला की नाही? या प्रवासात दोघांत राजकीय चर्चा झाली की अन्य मुद्यांवर विचारांचे आदानप्रदान झाले, याची माहिती समजू शकली नाही....Body:शिर्डी_विखे थोरात यांचा एकचा विमानात दिल्ली वारी....
Conclusion:शिर्डी_विखे थोरात यांचा एकचा विमानात दिल्ली वारी....
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.