ETV Bharat / state

जैनमुनी स्वागत फलक चोरी प्रकरण : आमदार संग्राम जगतापांची पोलिसात तक्रार; राजकारण तापण्याची शक्यता - जैनमुनी स्वागत फलक

शहरात जैन धर्माचे आचार्य सम्राट डॉ. शिवमुनीजी महाराज साब व युवाचार्य महेंद्रऋषीजी महाराज साब यांचे धार्मीक कार्यक्रमानिमित्त नगर शहरात आगमन झाले आहे. त्यांचे स्वागत विविध संस्था-संघटना आणि राजकीय नेत्यांकडून करण्यात येत आहे.

जैनमुनी स्वागत फलक चोरी प्रकरणी आमदार संग्राम जगतापांची पोलिसात तक्रार
author img

By

Published : Jun 10, 2019, 9:45 AM IST

अहमदनगर - शहरातील शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱया नेता सुभाष चौकातून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांचा जैनमुनींच्या स्वागताचा फलक गायब झाल्याने नव्या राजकीय वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. फलक चोरीला गेल्याची तक्रार आमदार जगताप यांच्याकडून कोतवाली पोलीस ठाण्यात दिली आहे.

जैनमुनी स्वागत फलक चोरी प्रकरणी आमदार संग्राम जगतापांची पोलिसात तक्रार; राजकारण तापण्याची शक्यता

शहरात जैन धर्माचे आचार्य सम्राट डॉ. शिवमुनीजी महाराज साब व युवाचार्य महेंद्रऋषीजी महाराज साब यांचे धार्मीक कार्यक्रमानिमित्त नगर शहरात आगमन झाले आहे. त्यांचे स्वागत विविध संस्था-संघटना आणि राजकीय नेत्यांकडून करण्यात येत आहे. आमदार जगताप यांनीही जैनमुनींच्या स्वागताचा फलक नवीपेठ जैन स्थानक, नेतासुभाष चौकात लावला होता, पण रविवारी रात्रीच्या सुमारास सदर फलक अज्ञातांनी काढून टाकला. हा फलक काही विघ्नसंतोषी, गलिच्छ लोकांनी काढून त्याजागी त्यांचा फलक लावल्याची तक्रार आमदार जगताप यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिली आहे. परिसरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज पोलिसांनी तपासून आरोपींचा शोध लावावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

नवी पेठ-नेता सुभाष चौक हा शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड यांचा बालेकिल्ला समजला जातो. त्यामुळे येथून जैनमुनींच्या स्वागताचा फलक गायब झाल्याने शहरात राजकीय वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आमदार संग्राम जगताप यांनी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली होती. यादरम्यान शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड आणि जगताप यांच्यात टोकाचे आरोप-प्रत्यारोप झाले होते. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जगताप-राठोड आमने-सामने असणार आहेत. त्यामुळे सध्या दोन्ही बाजूने आरोप-प्रत्यारोपाची संधी कुणीही सोडत नाहीत. महानगरपालिकेच्या कचरा डेपोला लागलेल्या आग प्रकरण ताजे असतानाच आता फलक चोरीला गेल्याचा विषय पुढे आल्याने शहरातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

Intro:अहमदनगर- जैनमुनी स्वागत फलक चोरीला गेल्याची आ.संग्राम जगतापांची पोलिसात तक्रार.. फलक प्रकरणावरून राजकारण तापणार!!Body:अहमदनगर- राजेंद्र त्रिमुखे
Slug-
mh_ahm_mla_jagtap_banner_thief_2019_vij1_7204297

अहमदनगर- जैनमुनी स्वागत फलक चोरीला गेल्याची आ.संग्राम जगतापांची पोलिसात तक्रार.. फलक प्रकरणावरून राजकारण तापणार!!

अहमदनगर- नगर शहरातील शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या नेता सुभाष चौकातुन राष्ट्रवादी काँग्रेसचे आ.संग्राम जगताप यांचा जैनमुनींच्या स्वागताचा फलक गायब झाल्याने नव्या राजकीय वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. आ.संग्राम जगताप यांच्या कडून जैन मुनींच्या स्वागताचे फलक चोरीला गेल्याची तक्रार कोतवाली पोलिस ठाण्यात दिली आहे. शहरात जैन धर्माचे आचार्य सम्राट डॉ. शिवमुनीजी महाराज साब व युवाचार्य महेंद्रऋषीजी महाराज साब यांचे धार्मीक कार्यक्रमानिमित्त नगर शहरात आगमन झाले आहे. त्यांचे स्वागत विविध संस्था-संघटना आणि राजकीय नेत्यांकडून करण्यात येत आहे. आ.जगताप यांनीही जैन मुनींच्या स्वागताचा फलक नवीपेठ जैन स्थानक, नेतासुभाष चौकात लावला होता. पण काल रात्रीच्या सुमारास सदर फलक अज्ञातांनी काढून टाकला. हा फलक काही विघ्नसंतोषी, गलिच्छ लोकांनी काढून त्याजागी त्यांचा फलक लावल्याची तक्रार आ.जगताप यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिली आहे. परिसरात असलेल्या सीसीटीव्ही केमेऱ्याचे फुटेज पोलिसांनी तपासून आरोपींचा शोध लावावा अशी मागणी त्यांनी केली आहे.
नवीपेठ-नेता सुभाष चौक हा शिवसेनेचे मा. आ. अनिल राठोड यांचा बालेकिल्ला समजला जातो. त्यामुळे येथून जैन मुनींच्या स्वागताचा फलक गायब झाल्याने शहरात राजकीय वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आ.संग्राम जगताप यांनी राष्ट्रवादी कडून निवडणूक लढवली होती. यादरम्यान शिवसेनेचे मा.आमदार असलेले अनिल राठोड आणि जगताप यांच्यात टोकाचे आरोप-प्रत्यारोप झाले होते. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जगताप-राठोड आमने-सामने असणार आहेत. त्यामुळे सध्या दोन्ही बाजूने आरोप-प्रत्यारोपाची संधी कुणीही सोडत नाहीत. महानगरपालिकेच्या कचरा डेपोला लागलेल्या आग प्रकरण ताजे असतानाच आता फलक चोरीला गेल्याचा विषय पुढे आल्याने शहरातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

-राजेंद्र त्रिमुखे, अहमदनगर.Conclusion:अहमदनगर- जैनमुनी स्वागत फलक चोरीला गेल्याची आ.संग्राम जगतापांची पोलिसात तक्रार.. फलक प्रकरणावरून राजकारण तापणार!!
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.