ETV Bharat / state

आमदार रोहित पवारांच्या 'जनता सुसंवाद'मध्ये तक्रारींचा पाऊस.. - आमदार रोहित पवारांच्या 'जनता सुसंवाद'मध्ये तक्रारींचा पाऊस

आमदार रोहित पवार यांनी जामखेड येथे आयोजित केलेल्या जनता सवांदात शहर व तालुक्यातील नागरिकांनी विविध खात्यासंदर्भात रस्ता, वीज, पाणी, आरोग्य, कचरा डेपो, अतिक्रमण, क्रीडा संकुल या विभागांविरोधात तक्रारींचा पाऊस पाडला.

आमदार रोहित पवार
आमदार रोहित पवार
author img

By

Published : Mar 11, 2020, 9:16 AM IST

Updated : Mar 11, 2020, 9:29 AM IST

अहमदनगर - आमदार रोहित पवार यांनी जामखेड येथे आयोजित केलेल्या जनता सवांदात शहर व तालुक्यातील नागरिकांनी विविध खात्यासंदर्भात रस्ता, वीज, पाणी, आरोग्य, कचरा डेपो, अतिक्रमण, क्रीडा संकुल या विभागांविरोधात तक्रारींचा पाऊस पाडला. बांधकाम विभाग व महावितरण विभागाच्या गावागावात मोठ्या प्रमाणात तक्रारी करण्यात आल्या. नागरिकांच्या तक्रारींची दखल घेऊन सात दिवसांच्या आत तक्रारींचे निवारण करण्याचे निर्देश पवार यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.

आमदार रोहित पवारांच्या 'जनता सुसंवाद'मध्ये तक्रारींचा पाऊस

कार्यक्रम स्थळी शेकडो तक्रारदार दाद मागण्यासाठी ठिय्या देऊन होते. निवेदनांवर आणि प्रत्यक्ष मांडलेल्या तक्रारी सोडविण्यासाठी तत्काळ आदेश देऊन हे प्रश्न निर्गमित केले. यावेळी जनता संवादाला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत एकूण १२० तक्रारी जनतेकडून प्राप्त झाल्या. यामध्ये वैयक्तिक तसेच सार्वजनिक स्वरुपाच्या तक्रारींचा समावेश होता. विविध विभागांच्या कामांबाबतच्या लेखी स्वरुपातील तक्रारी नागरिकांनी पवार यांना दिल्या.

हेही वाचा - ...अन् आमदार पतीच्या ढोलकीवर खासदार नवनीत राणा यांनी धरला ठेका

यानंतर विभाग प्रमुखांनी प्राप्त तक्रारींचा सात दिवसाच्या आत आपल्या स्तरावर आढावा घ्यावा, असे पवार यांनी सांगितले. या वेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांच्या प्रश्नांसह प्रलंबित, महावितरण, आरोग्य विभाग, या विभागांसंदर्भात मोठ्या प्रमाणात फोटोसह लेखी तक्रारी प्राप्त झाल्या. त्यानुसार तातडीने संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगून जास्तीत तक्रारींचा निपटारा या जनता सवांदात करण्यात आला.

या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशउपाध्यक्ष राजेंद्र कोठारी, तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, पंचायत समिती सदस्य सूर्यकांत मोरे, महावितरणचे उपअभियंता बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, तालुका आरोग्य अधिकारी, यांच्यासह विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा - जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर पहिल्यांदाच पैठणचा नाथषष्ठी सोहळा रद्द

Last Updated : Mar 11, 2020, 9:29 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.