अहमदनगर - मुळा एज्युकेशन सोसाईटीच्या सोनईच्या ज्ञानेश्वर कॉलेजमध्ये ‘यशोरंग’ या वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रशांत गडाख उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांच्या आग्रहाखातर त्यांनी त्यांच्या पत्नीसह ‘रंग बरसे’ या गाण्यावर ताल धरला. प्रशांत गडाखांच्या नृत्याला विद्यार्थ्यांनीही दाद दिली.
हेही वाचा... 'काँग्रेसमुक्त भारताचे स्वप्न पाहणाऱ्या भाजपला महाराष्ट्रातून मुक्त करण्यासाठी प्रयत्नशील रहा'
कार्यक्रमात ‘रंग बरसे’ या अमिताभ बच्चन यांच्या ‘कभी कभी’ चित्रपटातल्या गीतावर प्रशांत गडाख आणि त्यांच्या पत्नी गौरी यांनी अप्रतिम डान्स करत उपस्थितांना आश्चर्यचकीत केले. यावेळी उपस्थित तरुण-तरुणींनी त्यांना टाळ्या आणि शिट्ट्यांनी जोरदार प्रतिसाद दिला. प्रशांत गडाख यांनी अमिताभ बच्चन यांनी केलेल्या नृत्याची आठवण करून दिली. त्यांना त्यांची पत्नी गौरी यांनी देखील उत्तम साथ दिली. शिवाय शालेय विद्यार्थ्यांनीही त्यांच्यासोबत नृत्य केले
माजी आमदार प्रशांत गडाख आणि त्यांच्या पत्नी गौरी यांच्या या डान्सचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. तसेच त्यांच्या नृत्याचे कौतुक देखील होत आहे.
हेही वाचा... संतापजनक..! जालन्यात प्रेमी युगुलाला मारहाण, विनयभंग झाल्याने तरुणीने घेतले विष