अहमदनगर- अण्णा हजारे यांनी यापूर्वीच हायकोर्टात ( High Court ) एक जनहित याचिका ( Public Interest Litigation ) दाखल करून चौकशीची मागणी केली आहे. त्याप्रमाणे राज्यसरकरनेही या कारखाने विक्री प्रकरणाची चौकशी केलेली आहे. जे साखर कारखाने तोट्यात जाऊन बंद पडले होते त्या कारखान्यावर राज्य सहकारी बँक आणि जिल्हा सहकारी बँकेचे कर्ज होते. त्यामुळे राज्य सहकारी बँकांनी बंद पडलेल्या साखर कारखान्याचे मूल्यांकन करून जास्त बोली लावणाऱ्यांना विकले ते आहेत. आता यावर अधिक बोलण्यासारखे काही नसल्याचे ग्रामविकास तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ ( Minster Hasan Mushrif ) म्हणाले.
अण्णा हजारे यांनी चौकशीसाठी पतप्रधान व केंद्रीय सहकार मंत्र्यांना पाठवले होते पत्र - ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे ( Anna Hajare ) यांनी सोमवारी (दि. 24 जानेवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendrea Modi ) आणि केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह ( Union Minister Amit Shah ) यांना पत्र पाठवले होते. त्या पत्रद्वारे राज्यातील तोट्यात गेलेले आणि बंद पडलेल्या सहकारी कारखाना विक्री प्रकरणात तब्बल 25 हजार कोटीचा घोटाळा ( Sugar Factory Sales Scam ) झाल्याचा त्यांनी आरोप केला. या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाईची करा, अशी मागणीही केली आहे.
प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री शहरात दाखल - पालकमंत्री हसन मुश्रीफ ( Minister Hasan Mushrif ) यांचे प्रजासत्ताक दिनाच्यापूर्वसंध्येला मंगळवारी (दि. 25 जानेवारी) अहमदनगर शहरात आगमन झाले. त्यानंतर त्यांनी नूतन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीची ( Collector Office Ahmednagar ) पाहणी केली. नूतन जिल्हाधिकारी कार्यालयातील सोयीसुविधेचे त्यांनी कौतुक केले. त्यानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला.
जिल्ह्यातील शाळा आठवडाभर लांबणीवर - अहमदनगर जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. मागील चोवीस तासांतही दोन हजारांवर नवे बाधित रुग्ण ( Ahmednagar Corona Update ) आढळले आहे. यामुळे खबरदारी म्हणून जिल्ह्यातील सर्व शाळा आणखी किमान आठवडाभर सुरू होणार नसल्याची ( Schools Close in Ahmednagar District ) माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज दिली. आठवड्यानंतर जिल्ह्यातील कोरोना बाबतचा आढावा घेऊन शाळा कधी सुरू करता येतील हे जिल्हा प्रशासन ठरवेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.