ETV Bharat / state

भोजपूर धरणाच्या पाणी पुरवठा योजनेमुळे पाच गावांचा पाणीप्रश्न मार्गी लागणार - बाळासाहेब थोरात

संगमनेर तालुक्यातील निमोण, क-हे ,सोनेवाडी पिंपळे व पळसखेड या 5 गावांसाठी महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून थेट ग्रॅव्हिटीद्वारे पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे.

minister
भूमिपूजन करताना महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
author img

By

Published : Aug 24, 2020, 10:22 PM IST

अहमदनगर - भोजापूर धरणातून ग्रॅव्हिटीद्वारे थेट संगमनेर तालुक्यातील निमोण, क-हे ,सोनेवाडी पिंपळे व पळसखेडे या पाच गावांना पाणीपुरवठा होणार आहे. या गावांचा पाणीप्रश्न कायमचा सुटेल असा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला. त्यांच्या हस्ते या योजनेचे भूमिपूजन करण्यात आले.

संगमनेर तालुक्यातील निमोण, क-हे ,सोनेवाडी पिंपळे व पळसखेड या 5 गावांसाठी महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून थेट ग्रॅव्हिटीद्वारे पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे. भोजपूर धरणाजवळ जॅकवेलचे कामही ही पूर्णत्वास येत आहे.15 किलोमीटरची ही पाईपलाईन असून यामधून ग्रॅव्हिटी द्वारे या गावांना पाणी मिळणार आहे.

यावर्षी सर्वत्र समाधानकारक पाऊस झाला आहे.निमोन तळेगाव परिसरातही चांगला पाऊस झाल्याने शेतकरी समाधानी आहे. तळेगाव परिसरातील गावांसाठी प्रवरा नदीवरून थेट पाईपलाईन योजना आणली तिचे पाणी देवकौठे पर्यंत मिळत आहे .ही योजना योजना 16 गावांना पाणी पुरवत आहे. या योजनेप्रमाणेच निमोण, क-हे , सोनेवाडी, पिंपळे व पळसखेडे या 5 गावांचा पाणी प्रश्न या प्रादेशिक योजनेमुळे मार्गी लागणार आहे.भोजूर धरणातून ग्रॅव्हिटी द्वारे या गावांना पाणी उपलब्ध होणार असल्याने विजेच्या खर्चात बचत होऊन नागरिकांना स्वच्छ व मुबलक पाणी मिळेल असल्याच बाळासाहेब थोरात म्हणाले आहे.

संगमनेर तालुक्यात अनेक विकासकामे सुरू आहेत.तालुक्यातील जनतेवर आपल्या जनतेने आपल्यावर भरभरून प्रेम केले असून आपणही कायम अविश्रांतपणे काम केले आहे. अत्यंत महत्त्वाच्या जबाबदार्‍या असतानासुद्धा संगमनेर तालुक्यातील वाडी वस्तीवरील प्रत्येक नागरिकाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण काम करत आहोत. संगमनेर तालुका हा सर्व क्षेत्रात आघाडीवर राहून रायात मॉडेल ठरावा यासाठी आपला कायम प्रयत्न राहिला असल्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले आहे.

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.