अहमदनगर - मी पुन्हा येईल अशा अनेक घोषणा करणारे देवेंद्र फडणवीस फक्त घोषणा करतात त्यांच्या घोषणा प्रत्यक्षात खऱ्या होत नाही. त्यामुळे फडणवीसांनी मध्यवर्ती निवडणुकीबाबत केलेली घोषणाही हवेतच राहणार असल्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले. मध्यवर्ती निवडणूक होणार नाहीत. आमचे सरकार आणखी तीन वर्षे चालेल. एवढंच नाही तर पुन्हा आघाडी सरकार आले तर कोणी आश्चर्य मानू नये, असेही महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले आहे.
संगमनेर तालुक्यात दरवर्षी जयहिंद युवा मंचच्या वतीने डोंगर टेकड्या आणि माळराणावर पावसाळ्यात दंड आरण्य अभियानाअंतर्गत बियांच्या रोपन आणि झाडे लावण्यात येतात. यंदाच्या सोळाव्या वर्षीही बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते झाड लावत या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला आहे. दरवर्षी राज्यात शासन झाडे लावण्याची मोहीम सुरु करतात. मात्र सध्या वनमंत्री पद रिक्त आहे. या प्रश्नावर थोरातांनी वनमंत्री पद हे मुख्यमंत्र्याकडे आहे. त्यामुळे काम जोमाने होईल. मात्र दरवर्षी सरकारचं झाडे लावण्याच्या कार्यक्रमाची घोषणा करेल ही पध्दत आता बदलली पाहिजे, असल्याचे ते यावेळी म्हणाले.
जयहिंद युवा मंच दरवर्षी दंडक आरण्य अभियानाअंतर्गत झाडे लावण्याची मोहीम राबवते. तशीच मोहीम सर्वांनी राबवली पाहिजे, असल्याचे थोरात म्हणाले आहे. राज्यात कृषी कायदा लागू करताना आम्ही चर्चा करुन काही बदल सुचविले आहेत. अजुनही कोणाच्या काही सुचना असतील तर त्यांनी त्या कळवाव्या. आम्ही शेतकऱ्यांच्या भल्याचा कायदा आणत असल्याचेही म्हणाले.