ETV Bharat / state

दूध उत्पादक शेतकरी आक्रमक; रस्त्यावर दूध ओतून आंदोलन, येणाऱ्या काळात बळीराजा दिसेल नक्षलवाद्यांच्या भूमिकेत

Rahuri Farmers Movement : राज्यातील शेतकऱ्यांचा प्रश्न चांगलाच तापला असून शेतकरी संघटनांसह काँग्रेसही शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आक्रमक झालेले दिसत आहे. शेतकऱ्यांच्या दुधाला भाव वाढ, कांद्यावरील निर्यात बंदी उठवावी. साखर कारखान्याच्या इथेनॉल निर्मितीवरील बंद तातडीने उठवावी यासह अन्य मागण्यांसाठी आज अहमदनगर जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आलंय.

Rahuri Farmers Movement
राहुरी शेतकरी आंदोलन
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 12, 2023, 4:52 PM IST

अहमदनगर जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलन

अहमदनगर Rahuri Farmers Movement : देशाला स्वातंत्र्य मिळले मात्र शेतकऱ्यांना स्वातंत्र्य मिळले नाही. शेतकऱ्यांना स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आता स्वातंत्र्यची दुसरी लढाई सुरू करावी लागणार आहे. सरकार आता जर शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष देत नसेल तर सरकारला गोळ्या घालण्याची भाषा यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष रवी मोरे यांनी केलीय. (Milk Farmers Aggressive) इतर राज्यात दुधाच्या भुकटीला 5 रुपये अनुदान दिलं जातंय. मात्र आपल्या राज्यात आमदार फोडण्यासाठी पैसे लागत असल्याने, खोके सरकारने शेतकऱ्यांना सुविधा देण्यास बंद केल्या असल्याचंही यावेळी मोरे म्हणाले.

गोळ्या घालण्याचा दिला इशारा : आधी अस्मानी आणि नंतर सुलतानी संकटाने शेतकरी मेटाकुटीला आलेला असताना शेतीला जोडधंदा असलेल्या दुधाचे दरही खासगी आणि सहकारी दूध संघांनी पाडले. त्यात सरकारने कांदा निर्यात बंदी (Onion Export Ban) आणि इथेनॉल निर्मातीला बंदी घालत शेतकऱ्यांचा जखमेवर मीठ चोळण्याचं काम केलं. आता शेतकरी आक्रमक झाला असून आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या (Swabhimani Shetkari Sanghatana) नेतृत्वाखाली राहुरी बाजार समितीसमोर (Rahuri Bazar Committee) अहमदनगर- मनमाड महामार्ग अडवून धरत शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष न दिल्यास गोळ्या घालण्याचा इशारा दिलाय.

या करण्यात आल्या मागण्या :

१) दुधाला ३.५ फॅट / ८.५ एसएनएफसाठी प्रती लिटर किमान ३५ रूपये दर मिळावा.
२) केंद्र शासनाने कांद्याची अचानक केलेली निर्यात बंदी तत्काळ उठवावी.
३) साखर कारखान्यांच्या इथेनॉल निर्मितीवर घातलेली बंदी त्वरीत मागे घ्यावी.
४) मागील वर्षी अवकाळीमुळे झालेल्या पिकांची नुकसान भरपाई अद्यापही शेतकर्‍यांना मिळाली नााही. नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या बँक खात्यात नुकसान भरपाई तत्काळ जमा करावी. या प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.

हिवाळी अधिवेशनात मांडला मुद्दा : केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय (Onion Export Ban) घेतल्याने महाराष्ट्रातील हजारो कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. अशातच राज्य विधिमंडळाच्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात विरोधकांनी हा मुद्दा जोरात उचलून धरला. (Onion Producer Farmers) यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कांदा निर्यात बंदी उठवली गेली नाही तर, राज्यातील सर्व कांदा केंद्र सरकार खरेदी करणार, असं विधानपरिषदेमध्ये सांगितलं.

हेही वाचा -

  1. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधक आक्रमक, दिल्ली दरबारी सत्ताधारी नेत्यांच्या भेटीगाठी
  2. शेतकरी झाला कासावीस खोके सरकार ४२०, विरोधकांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन
  3. कांदा प्रश्नावर मोठी बातमी, केंद्र सरकार खरेदी करणार महाराष्ट्रातील सर्व कांदा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.