ETV Bharat / state

धरण उशाला, कोरड घशाला; पाण्यामुळे नागरिकांवर स्थलांतरीत होण्याची वेळ

राहुरी तालुक्यात बुळेपठार हे आदिवासी महसूल दर्जाचे गाव आहे. जिल्ह्याला पाणी पुरवणाऱया मुळा धरणापासून हे गाव फक्त सात किलोमीटर अंतरावर आहे. तरीही या गावाला अद्यापही नळयोजना किंवा पाणीयोजना पोहोचु शकली नाही.

धरण उशाला, कोरड घशाला; पाण्यामुळे नागरिकांवर स्थलांतरीत होण्याची वेळ
author img

By

Published : May 14, 2019, 5:36 PM IST

अहमदनगर - जिल्ह्यात दुष्काळची दाहकता दिवसेंदिवस भीषण बनत चालली आहे. जिल्ह्याची तहान भागवणाऱया मुळा धरणाच्या लाभक्षेत्रातील नागरिकांनाच हंडाभर पाण्यासाठी दिवसभर वनवन फिरावे लागत आहे. याच पाण्याच्या विवंचनेतून काही ग्रामस्थांवर स्थलांतरीत होण्याची वेळही आली आहे.

राहुरी तालुक्यात बुळेपठार हे आदिवासी महसूल दर्जाचे गाव आहे. जिल्ह्याला पाणी पुरवणाऱया मुळा धरणापासून हे गाव फक्त सात किलोमीटर अंतरावर आहे. तरीही या गावाला अद्यापही नळयोजना किंवा पाणीयोजना पोहोचु शकली नाही. २०० लोकसंख्या असलेले हे गाव उंच पठारावर असल्याने येथील नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. येथील विहिरी, बोअरवेलही कोरडे पडले आहेत.

या गावाला दिवसाआड टँकर येतो आणि त्यासाठीही तासंतास वाट बघावी लागत आहे. यातूनही एका व्यक्तीला केवळ २० लीटरच पाणी मिळते. त्यामुळे जनावरांना, कपडे, भांडी आणि अंघोळीसाठी पाणी आणायचे कुठून हा मोठा प्रश्न येथील ग्रामस्थांना पडला आहे. याच पाण्याच्या विवंचनेतून येथील काही ग्रामस्थांना स्थलांतरीत होण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. त्यामुळे प्रशासनाने तरी आमच्या व्यथा जाणून उपाययोजना कराव्यात, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.

Intro:

Shirdi_Ravindra Mahale

ANCHOR_अहमदनगर जिल्हाची तहान भागवणार्या
मुळाधरणाच्या लाभक्षेञातील नागरिकांना हंडा भर पाण्याची दिवसभर वाट पाहवी लागती आहे..याच पाण्याच्या विवंचनेतून ग्रामस्थांना स्तलांतरीत होण्याची दुर्दैवी वेळही येत आहे....

VO_ राहुरी तालुक्यातील हे आहे आदिवासी महसुल दर्जाचे बुळेपठार गाव मुळा धरणाभासुन अवघू सात किलोमीटर हे गाव तरी या गावाला अद्यापही पाणीयोजना पोहचुच शकली नाही.. 200 लोकसंख्या असलेले हे गाव उंच पठारावर असल्याने येथे नळ योजना अद्यापही पोहचु शकली नाही..येथील विहीरी,कुपनलिका हि कोरड्याच.हंडाभर पाण्यासाठी करवी लागती वनवन..टॅकरची पहावी लागते दिवसभर वाट..दिवआड टॅकर येत असल्याने मानसी केवळ 20 लीटर पाणी दिवसाड मिळतय..मग जनावरांना काय पाजायच..धुनी-भांडी अन् अंघोळीला पाणी नसत..केवळ पिण्यासाठी येनारा टॅकर त्याचीही दिवसबर वाट बघाचिय.याच पाण्याच्या विवंचनेतून येथील काही ग्रामस्थांना स्त॔लांतरीत होण्याची दुर्दैवी वेळ येत असल्याची चर्चा ग्रामस्थ सांगतायत....Body:14 May Shirdi Rahuri Water ProblemConclusion:14 May Shirdi Rahuri Water Problem
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.