ETV Bharat / state

Manmad APMC Election:  मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत दडपशाही? शिर्डीतील हॉटेलमध्ये पोलिसांचे सर्च ऑपरेशन - मनमाड कृषी उत्पन्न बाजार समिती

मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीची आज निवडणूक पार पडणार आहे. यातील काही उमेदवारांसह 400 मतदार शिर्डीतील 3जी हॉटेलमध्ये मुक्कामी असल्याची माहिती मनमाड पोलिसांसह शिर्डी पोलिसांना मिळाली होती. तेव्हा पोलिसांनी हॉटेलमध्ये मध्यरात्री सर्च ऑपरेशन केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. सत्ताधारी पोलिस बळाचा वापर करत असल्याचा आरोप ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख गणेश धात्रक यांनी केला आहे.

Manmad APMC Election
मनमाड एपीएमसी निवडणूक
author img

By

Published : Apr 30, 2023, 10:58 AM IST

Updated : Apr 30, 2023, 11:04 AM IST

अहमदनगर : राज्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांचा धुराळा उडत आहे. नाशिक जिल्ह्यातील मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शिवसेनेचे आमदार सुहास कांदे विरोधात महाविकास आघाडी अशी लढत पाहण्यास मिळत आहे. आज मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक पार पडत आहे. या निवडणूकीत एकूण 550 मतदार आहे. यातील 400 मतदार मविआकडे आहे, त्यामुळे दडपशाहीचे राजकारण सत्ताधारींकडून सुरु असल्याचा आरोप महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीचे मनमाड शहराध्यक्ष दिपक गोगड यांनी केला आहे.

साईबाबांचे दर्शन घेऊन मनमाडकडे रवाना : मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीची आज निवडणुक पार पडत आहे. त्यामुळे मविआचे काही उमेदवार आणि मविआकडे असलेले 400 मतदारांना घेवुन आम्ही शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी आलो. शिर्डीतील 3जी हॉटेलमध्ये मुक्कामी थांबलो आहे. सकाळी साईबाबांचे दर्शन घेऊन मनमाडकडे रवाना होणार आहे. आमचा मतदानाचा हक्क बजावणार आहे. मात्र आम्ही शिर्डीत मुक्कामी असल्याचे सत्ताधाऱ्यांना समजल्यानंतर पोलिस बळाचा वापर करत आम्हाला घेवून जाण्याचा प्रयत्न केला जात होता, असा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी यावेळी केला आहे. मनमाडमध्ये 4 मतदान केंद्रे आहेत. या गोंधळानंतर पोलिसांचा हॉटेलमधून काढता पाय घेतला.

कृषी उत्पन्न बाजार समित्यांसाठी मतदान : राज्यात 88 कृषी उत्पन्न बाजार समित्यांसाठी मतदानाची प्रक्रिया आज पार पडणार आहे. 47 कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मतदान 28 एप्रिलला पार पडले होते. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणामार्फत राज्यातील निवडणूकीस पात्र कृषि उत्पन्न बाजार समित्यांची निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. राज्यात 147 पैकी 76 कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर महाविकास आघाडीने आपला झेंडा फडकावला आहे. तर सत्ताधारी शिंदे आणि भाजप गटाला फक्त 31 बाजार समित्यांमध्ये विजय मिळाला आहे. या बाजार समित्यांच्या निवडणुकीत बऱ्याच दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

हेही वाचा : APMC Election Result : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेसची सरशी; 9 पैकी चार ठिकाणी मिळवला विजय

Last Updated : Apr 30, 2023, 11:04 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.