ETV Bharat / state

शिर्डीत साईबाबा हॉस्पिटलच्या दुसऱ्या मजल्यावरुन रुग्णाच्या पित्याने घेतली उडी - shirdi saibaba hospital

शिर्डी साईबाबा संस्थानच्या सुपर हॉस्पिटलमध्ये अॅडमिट असलेल्या मुलीस भेटण्यासाठी आलेल्या पित्यानेच हॉस्पिटलच्या छतावरून उडी मारल्याने खळबळ उडाली आहे. अंकुश आव्हाड असे उडी मारलेल्या व्यक्तिचे नाव आहे.

शिर्डी साईबाबा संस्थान हॉस्पिटल
author img

By

Published : Sep 29, 2019, 2:09 PM IST

Updated : Sep 29, 2019, 2:38 PM IST

अहमदनगर - शिर्डी साईबाबा संस्थानच्या सुपर हॉस्पिटलमध्ये अॅडमिट असलेल्या मुलीस भेटण्यासाठी आलेल्या पित्यानेच हॉस्पिटलच्या छतावरून उडी मारल्याने खळबळ उडाली आहे. अंकुश आव्हाड असे उडी मारलेल्या व्यक्तिचे नाव आहे. तर त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

शिर्डीत साईबाबा हॉस्पिटलच्या दुसऱ्या मजल्यावरुन रुग्णाच्या पित्यानेच घेतली उडी

हेही वाचा - श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघ : काका-पुतण्यांच्या अस्मितेच्या लढाईत कोण मारणार बाजी ?

अंकुश गुलाब आव्हाड (वय 55, रा. अखाडावाडा, ता. पैठण, जि. औरंगाबाद) वर्षीय व्यक्तीने थेट रुग्णालयाच्या दुसऱ्या मजला वरुन खाली उडी मारली. ही घटना रुग्णालय परिसरात असलेल्या काही रुग्णांच्या नातेवाईकांनी पाहिल्यानंतर आरडाओरड सुरु केली. यानंतर डॉक्टर आणि सुरक्षा कर्मचारी बाहेर धावून आले. त्यानंतर अंकुश यांच्यावर याच रुग्णालयात तातडीने उपचार सुरु करण्यात आले आहेत. आव्हाड यांनी उडी का मारली, याचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. आव्हाड यांचे जावई यांनी कुठलाही वाद त्यांच्यात झाले नसल्याचे म्हटले.

हेही वाचा - रामोजी उद्योग समुहाच्या मार्गदर्शी चीटफंडला यंदाचा 'एक्सलन्स बिझनेस अवॉर्ड'

घटनेची माहिती मिळताच, साई संस्थानचे कार्यकारी अधिकारी दिपक मुंगळीकर यांनीही रुग्णाच्या नातेवाईक यांची भेट घेतली. उडी मारण्याचे करण विचारले असता नातेवाईक यांनाही माहिती नसल्याचे मुंगळीकरना सांगितले. तर दुसरीकडे रुग्णालयात रुग्णांची हेंडसाळ होते आणि उपचार वेळेवर मिळत नाहीत. त्यामुळे संस्थानच्या रुग्णालयाचे नाव खराब होत आहे. देशातील क्रमांक 2 चे श्रीमंत देवस्थान म्हणून या संस्थानची ओळख आहे. तरीदेखील संस्थानच्या रुग्णालयात अनेक अडचणींचा सामना रुग्णांबरोबर नातेवाईकांना करावा लागत असल्याचा आरोप, सामाजिक कार्यकर्ते सचिन चौघुले यांनी केला.

हेही वाचा - माझ्या काकांनी एका झटक्यात कर्जमाफी केली...अजित पवारांचा विरोधकांना टोला

अनेक दिवसांपासून शिर्डी ग्रामस्थांकडून रुग्णालयात सीसी टीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी केली जात आहे. मात्र, साई संस्थान अजूनही त्याकडे दुर्लक्ष करत आहे. आज रुग्णालयात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले असते या प्रकाराला थांबवता आले असते, असेही त्यांनी म्हटले आहे.

Intro:

Shirdi_Ravindra Mahale

ANCHOR_ शिर्डी साईबाबा संस्थानच्या सुपर हाँस्पिटल मध्ये अड्मिट असलेल्या मुलीस भेटन्यासाठी आलेल्या पित्यानेच हाँस्पिटल च्या छतावरुण उड़ी मारल्याने खळबळ उडाली आहे..उडी मारलेल्या अंकुश आव्हाड यांच्या वर रुग्णालयात उपचार सुरु असुन त्यांची प्रकूती चिंताजनक आहे....

VO_ औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील अखाड़ावाडा येथील अंकुश गुलाब आव्हाड वय 55 वर्षीय गूहस्थ थेट रुग्णालयाच्या दुसऱ्या मजला वरुण
खाली उडी मारली ही घटना रुग्णालय परीसरात असलेल्या काही रुग्णाच्या नातेवाईकानी पहिल्या नतर आरडाओरड सुरु केल्या नंतर डॉक्टर आणि सुरक्षा कर्मचारी बाहेर धावुन आले त्या नंतर अंकुश यांच्यावर याच रुग्णालयात तातडीने उपचार सुरु करण्यात आले आहेत..आव्हाड यांनी उडी का मारली याचे कारण स्पष्ठ होवु शकले नाही आव्हाड यांचे जावाई यांनीही कुठले ही वाद त्यांच्यात झाले नसल्याच म्हटलय मात्र सासर्यांनी अश्या प्रकारे उडी मारल्याने जावाई नितिन हैरान झालयेत....

BITE_नितीन कोल्हे _ उडी मरणाऱ्या रुग्णाचे जावाई

VO_ या घटनेची माहीती मिळताच साई सस्थानचे कार्यकारी अधिकारी दिपक मुंगळीकर यांनीही रुग्णाच्या नातेवाईक यांची भेट घेतलीय उडी मारण्याचे करण विचारले असता नातेवाईक यांनाही माहिती नसल्याच मुंगळीकरना सांगीतलय मात्र दुसरीकडे या रुग्णालयात रुग्णांची हेंडसाळ होचे उपचार वेळेवर मिळत नाहीत त्या मुळे संस्थानच्या रुग्णलयाचे नाव खराब होते आहे..देशातील दोन नबर श्रीमंत देवस्थान म्हणून ओळख असणाऱ्या संस्थानच्या रुग्णालयात अनेक अडचणीचा समान रुग्णा बरोबर नातेवाईकाना करवा लागत असल्याचा आरोप शिर्डीतील सामाजिक कार्यकर्ते सचिन चौघुले यांनी केलाय अनेक दिवसा पासून शिर्डी ग्रामस्थान कडून रुग्णलयात सी सी टीव्ही कैमरे बसवन्यची मागणी केल्या जात आहे मात्र साई संस्थान अजुन ही दुर्लक्ष करत आहे..आज रुग्नलयात सी सी टीव्ही कैमेरे बसवाले असते तर अंकुश यांनी का उडी मारली किव्हा त्यांच्या बरोबर काही अनुचित प्रकार घडला का हे निचित समोर आले असते....

BITE_सचिन चौघुले _ सामाजिक कार्यकर्ते शिर्डी Body:mh_ahm_shirdi hospital problem_29_visuals_bite_mh10010Conclusion:mh_ahm_shirdi hospital problem_29_visuals_bite_mh10010
Last Updated : Sep 29, 2019, 2:38 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.