अहमदनगर - जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांत मोठी राजकीय उलथापालथ झालेली पाहायला मिळत आहे. एकूण बारा विधानसभा मतदारसंघाचा आज फैसला होत आहे. सकाळी आठ वाजल्यापासून निकाल सुरू झाला आहे. उत्तर महाराष्ट्रातील महत्त्वाचा मानल्या जाणाऱ्या या जिल्ह्यातील कर्जत-जामखेड मतदारसंघातील शरद पवार यांचे नातू रोहीत पवार विरुद्ध पालकमंत्री राम शिंदे तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, जगताप आणि नुकतेच भाजपवासी झालेले विखे-पाटील या महत्त्वाच्या व्यक्तींच्या परिक्षेचा निकाल येत आहे.
Live Update:
-
नेवासा मतदारसंघातून शेतकरी क्रांतीकारी पक्षाचे शंकरराव गडाख यांचा 30373 मतांनी विजय, भाजपच्या बाळासाहेब मुरकुटेंचा पराभव
-
श्रीगोंदा मतदारसंघातून भाजपचे बबनराव पाचपूते 5000 मतांनी आघाडीवर तर राष्ट्रवादीचे घनश्याम शेलार पिछाडीवर
-
कोपरगाव मतदारसंघात राष्ट्रवादीच्या आशुतोष काळेंचा निसटता विजय. केवळ 848 मतांनी भाजपच्या स्नेहलता कोल्हे यांचा पराभव
-
शेवगाव मतदारसंघातून भाजपच्या मोनिका राजळे यांचा 14700 मतांनी विजय. राष्ट्रवादीचे प्रताप ढाकणे यांचा पराभव
-
राहुरी मतदारसंघातून भाजपचे शिवाजी कर्डीले यांचा पराभव, राष्ट्रवादीच्या प्राजक्त तनपुरे विजयी.
-
अहमदनगर शहर मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या संग्राम जगताप यांचा 10 हजार मतांनी विजय. शिवसेनेच्या अनिल राठोड यांचा पराभव
-
कर्जत-जामखेडमध्ये भाजपला धक्का, राष्ट्रवादीचे रोहित पवारांचा जवळपास 42 हजार मतांनी विजय
-
नेवासा मतदार संघातून भाजपचे बाळासाहेब मुरकुटे यांची पिछाडी, शेतकरी क्रांतीकारी पक्षाचे शंकरराव गडाख 28225 मतांनी आघाडीवर
-
अकोले मतदारसंघातून गेली अनेक वर्षे सत्ता असलेल्या मधुकर पिचडांचे पुत्र वैभव पिचड यांचा मोठ्या फरकाने विजय, 57790 मतांनी किरण लहामटे विजयी झाले
-
अकोले मतदारसंघात राष्ट्रवादीचे किरण लहामटे यांना 57665 आघाडीवर, पिचड पिछाडीवर
-
श्रीरामपुरात पुन्हा कँग्रेसचाच आमदार, लहू कानडे मोठ्या फरकाने विजयी तर कॉग्रेसमधून शिवसेनेत गेलेल्या भाऊसाहेब कांबळेंना मतदारांनी नाकारले.
-
श्रीगोंदा मतदारसंघातून भाजपचे बबनराव पाचपूते 2800 मतांनी पिछाडीवर तर राष्ट्रवादीचे घनश्याम शेलार आघाडीवर
-
संगमनेरमधून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरांताचा दमदार विजय, 62200 मतांनी विजयी
-
18 व्या फेरी अखेर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात 54706 मतांनी आघाडीवर
-
नेवासा 11 फेरीनत बाळासाहेब मुरकुटे भाजपा 2809 तर शंकरराव गडाख अपक्ष 6946 मते मिळाली.
-
कोपरगाव विधानसभा फेरी 11 वी राष्ट्रवादीचे आशुतोष काळे - 48005, स्नेहलता कोल्हे - 48860, विजय वाहडणे - 2415, राजेश परजने- 9072. भाजपच्या स्नेहलता कोल्हे 855 मतांनी आघाडीवर
-
नेवासा मतदार संघातून भाजपचे बाळासाहेब मुरकुटे यांची पिछाडी, शेतकरी क्रांतीकारी पक्षाचे शंकरराव गडाख आघाडीवर
-
कोपरगाव मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या उमेदवारामध्ये काट्याची लढाई
- पारनेर मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार किरण लहामटे यांना पहील्या फेरीपासुन आघाडीवर
- श्रीरामपुरात पुन्हा कँग्रेसचाच आमदार होणार कॉग्रेस मधुन शिवसेनेत गेलेल्या भाऊसाहेब कांबळेंना मतदारांनी नाकरल्याची शक्यता
- अकोले मतदार संघातुन गेली अनेक वर्षे सत्ता असलेल्या मधुकर पिचडांचे पुत्र वैभव पिचड यांना मोठा धक्का
- संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार बाळासाहेब थोरात विजयाच्या जवळ
- 17 व्या फेरीनंतर कर्जत-जामखेडमध्ये राष्ट्रवादीचे रोहित पवार 24 हजार मतांनी आघाडीवर
- पारनेर मतदारसंघातून राष्ट्रवादीचे निलेश लंके यांची विजयाकडे वाटचाल
- पारनेर मतदारसंघातून राष्ट्रवादीचे निलेश लंके 53224 मतांनी आघाडीवर शिवसेनेचे विजय औटी पिछाडीवर
- कर्जत-जामखेडमध्ये भाजपला धक्का, राष्ट्रवादीचे रोहित पवार १८ हजार मतांनी आघाडीवर
- संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरातांची विजयाकडे वाटचाल
- नवव्या फेरीनंतर कोपरगाव मतदारसंघात राष्ट्रवादीचे आशुतोष काळे पिछाडीवर तर स्नेहलता कोल्हे 2094 मतांनी आघाडीवर
- सातव्या फेरीनंतर नेवासा मतदारसंघात आघाडी समर्थीत अपक्ष उमेदवार शंकरराव गडाख हे 4226 मतांनी आघाडीवर तरभाजपचे बाळासाहेब मुरकुटे पिछाडीवर
- कर्जत-जामखेडमध्ये भाजपला धक्का, राष्ट्रवादीचे रोहित पवार 19 हजार मतांनीआघाडीवर
- राहुरी मतदारसंघात राष्ट्रवादीचे प्राजक्त तनपुरे दहाव्या फेरीनंतर 13000 मतांनी आघाडीवर तर भाजपचे विद्यमान शिवाजी कर्डीले पिछाडीवर
- भाजपचे राधाकृष्ण विखे-पाटील मोठ्या फरकाने विजयी, काँग्रेसचे सुरेश थोरात पराभूत
- शेवगाव मतदारसंघातून भाजपच्या मोनिका राजळे या 6200 मतांनी आघाडीवर असून राष्ट्रवादीचे प्रताप ढाकणे हे पिछाडीवर
- पारनेर मतदारसंघातून राष्ट्रवादीचे निलेश लंके 35470 मतांनी आघाडीवर शिवसेनेचे विजय औटी पिछाडीवर
- आठव्या फेरी अखेर भाजपचे राधाकृष्ण विखे-पाटील 35 हजार 103 मतांनी आघाडीवर
- सहाव्या फेरीत कोपरगाव मतदारसंघात राष्ट्रवादीचे आशुतोष काळे हे 26694 मते घेऊन दुसऱ्या क्रमांकावर तर भाजपच्या स्नेहलता कोल्हे 27877 मते घेऊन आघाडीवर
- जामखेडमध्ये भाजपला धक्का, राष्ट्रवादीचे रोहित पवार 15 हजारांनी आघाडीवर
- सहाव्या फेरीत श्रीरामपूर मतदारसंघात काँग्रेसचे लहू कानडे 25689 मते मिळवून 5677 मतांनी आघाडीवर तर शिवसेनेचे भाऊसाहेब कांबळे यांनी 20012 मते घेऊन पीछाडीवर आहेत.
- पाचव्या फेरीत नेवासा मतदारसंघात अपक्ष उमेदवार शंकरराव गडाख 2591 मतांनी आघाडीवर तर भाजपचे बाळासाहेब मुरकुटे पीछाडीवर
- अकोले मतदारसंघात राष्ट्रवादीचे किरण लहामटे 10671 मतांनी आघाडीवर तर भाजपचे वैभव पीचड पीछाडीवर आहेत.
- श्रीरामपूर मतदारसंघात काँग्रेसचे लहू कानडे 3221 मतांनी आघाडीवर तर शिवसेनेचे भाऊसाहेब कांबेळे पीछाडीवर आहेत.
- भाजपचे राधाकृष्ण विखे-पाटील 26724 मतांनी आघाडीवर
- नेवासा मतदारसंघात आघाडी समर्थीत अपक्ष उमेदवार शंकरराव गडाख हे 738 मतांनी आघाडीवर
- 10:00 - संगमनेर मतदारसंघात काँग्रेसचे बाळासाहेब थोरात 5487 मतांनी आघाडीवर
- 9:59 - कर्जत-जामखेड मतदारसंघातून राष्ट्रवादीचे रोहीत पवार 7131 मतांनी आघाडीवर आहेत.
- 9:50 - भाजपचे राधाकृष्ण विखे-पाटील 18850 मतांनी आघाडीवर आहेत तर काँगेसचे सुरेश थोरात पिछाडीवर आहेत
- 9:50 - राहुरी मतदारसंघातून भाजपचे शिवाजी कर्डीले पीछाडीवर तर राष्ट्रवादीचे प्राजक्त तनपुरे यांची 2200 मतांनी आघाडी
- 9:46 - भाजपचे राधाकृष्ण विखे-पाटील 14382 मतांनी आघाडीवर आहेत तर काँगेसचे सुरेश थोरात पिछाडीवर आहेत
- 9:45 - कोपरगाव मतदारसंघात राष्ट्रवादीचे आशुतोष काळे हे पहिल्या फेरीत 494 मतांनी आघाडीवर तर भाजपच्या स्नेहलता कोल्हे पीछाडीवर
- 9:45 - संगमनेर मतदारसंघात काँग्रेसचे बाळासाहेब थोरात 1196 मतांनी आघाडीवर
- 9:42 - कर्जत-जामखेड मतदारसंघातून राष्ट्रवादीचे रोहीत पवार 5991 मतांनी आघाडीवर आहेत.
- 9:33 - पारनेर मतदारसंघातून राष्ट्रवादीचे निलेश लंके 5740 मतांनी आघाडीवर
- 9:33 - शेवगाव मतदारसंघात राष्ट्रवादीचे प्रताप ढाकणे 6000 मतांनी आघाडीवर तर भाजपच्या मोनिका राजळे पिछाडीवर
- 9:19 - कर्जत-जामखेड मतदारसंघातून राष्ट्रवादीचे रोहीत पवार 4000 मतांनी आघाडीवर आहेत.
- 9:08 - अकोले मतदारसंघात राष्ट्रवादीचे किरण लहामटे 4000 मतांनी आघाडीवर आहेत भाजपचे वैभव पीचड पिछाडीवर आहेत.
- 9:08 - श्रीरामपूर मतदारसंघात काँग्रेसचे लहू कानडे 1260 मतांनी आघाडीवर तर शिवसेनेचे भाऊसाहेब कांबळे पिछाडीवर आहेत.
- 9:05 - कोपरगाव मतदारसंघात राष्ट्रवादीचे आशुतोष काळे हे पहिल्या फेरीत 5457 मतांनी आघाडीवर तर भाजपच्या स्नेहलता कोल्हे पीछाडीवर
- 9:05 - संगमनेर मतदारसंघात काँग्रेसचे बाळासाहेब थोरात 850 मतांनी आघाडीवर
- 9:05 - नेवासा मतदारसंघात आघाडी समर्थीत अपक्ष उमेदवार शंकरराव गडाख हे दुसऱ्या फेरीत १७३ मतांनी पिछाडीवर भाजपचे बाळासाहेब मुरकुटे आघाडीवर आहेत.
- 9:00 - नेवासा मतदारसंघात आघाडी समर्थीत अपक्ष उमेदवार शंकरराव गडाख हे 501 मतांनी आघाडीवर असून भाजपचे बाळासाहेब मुरकुटे हे पीछाडीवर आहेत.
- 8:50 - भाजपचे राधाकृष्ण विखे-पाटील 4874 मतांनी आघाडीवर आहेत तर काँगेसचे सुरेश थोरात पिछाडीवर आहेत
- 8:45 - पारनेर मतदारसंघातून राष्ट्रवादीचे निलेश लंके आघाडीवर
- 8:40 - कर्जत-जामखेड मतदारसंघातून राष्ट्रवादीचे रोहीत पवार 3091 मतांनी आघाडीवर आहेत.
- 8:25 - राहुरी मतदारसंघातून भाजपचे शिवाजी कर्डीले आघाडीवर तर राष्ट्रवादीचे प्राजक्त तनपुरे पिछाडीवर आहेत
- 8:25 - श्रीगोंदा मतदारसंघातून भाजपचे बबनराव पाचपूते आघाडीवर असून राष्ट्रवादीचे घनश्याम शेलार पिछाडीवर
- 8:25 - शेवगाव मतदारसंघातून भाजपच्या मोनिका राजळे या आघाडीवर असून राष्ट्रवादीचे प्रताप ढाकणे हे पिछाडीवर
- 8:25 - नगर शहर मतदारसंघातून संग्राम जगताप आघाडीवर तर शिवसेनेचे अनिलभैय्या राठोड हे पिछाडीवर
- 8:25 - पारनेरमधून शिवसेनेचे विजय औटी आघाडीवर तर राष्ट्रवादीचे निलेश लंके पिछाडीवर
- 8:25 - कर्जत-जामखेड मतदारसंघातून भाजपचे राम शिंदे आघाडीवर तर राष्ट्रवादीचे रोहीत पवार पिछाडीवर
- 8:00 - पोस्टल मतमोजणीला सुरुवात