ETV Bharat / state

प्रेमास विरोध झाल्याने प्रेमीयुगुलाने घेतला गळफास, युवतीचा मृत्यू तर युवक अत्यवस्थ - Ahmednagar

कडा (ता-आष्टी, जि-बीड) येथील मुकुंद बाबासाहेब भोजने आणि अवंतिका रघुनाथ दळवी या दोघांनी नगर-जामखेड रोडवरील चिंचोडी पाटील शिवारातील बंद पडलेल्या एका हॉटेलमध्ये मंगळवारी रात्री गळफास लावून घेतला. तत्पूर्वी मुकुंदने आपल्या भावास फोन करून आंतरजातीय प्रेमसबंधास विरोध होत असल्याने आपण आत्महत्या करत असल्याचे कळवले होते.

प्रेमास विरोध झाल्याने प्रेमीयुगुलाने घेतला गळफास, युवतीचा मृत्यू तर युवक अत्यवस्थ
author img

By

Published : Jun 5, 2019, 11:10 PM IST

अहमदनगर- जामखेड रोडवर चिंचोडी पाटील शिवारात रस्त्याच्या कडेला असलेल्या एका बंद हॉटेलमध्ये एका प्रेमी युगुलाने आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेत तरुणीचा मृत्यू झाला असून युवक अत्यवस्थ आहे. हे दोघेही बीड जिल्ह्यातील कडा येथील रहिवासी आहेत. आंतरजातीय प्रेमसंबंधास विरोध असल्याने दोघांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे. मात्र, मृत मुलीच्या आईच्या तक्रारीवरून युवकाविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.

प्रेमास विरोध झाल्याने प्रेमीयुगुलाने घेतला गळफास, युवतीचा मृत्यू तर युवक अत्यवस्थ

याबाबत मिळालेली माहीती अशी की, कडा (ता-आष्टी, जि-बीड) येथील मुकुंद बाबासाहेब भोजने आणि अवंतिका रघुनाथ दळवी या दोघांनी नगर-जामखेड रोडवरील चिंचोडी पाटील शिवारातील बंद पडलेल्या एका हॉटेलमध्ये मंगळवारी रात्री गळफास लावून घेतला. तत्पूर्वी मुकुंदने आपल्या भावास फोन करून आंतरजातीय प्रेमसबंधास विरोध होत असल्याने आपण आत्महत्या करत असल्याचे कळवले होते. त्याने आपण कुठे आहोत हे पण कळवले होते. त्यामुळे मुकुंदच्या घरच्यांनी संबंधित परिसरात शोध घेतला असता, त्यांना बंद हॉटेलमध्ये दोघेही गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत आढळले. यात मुलगी अवंतिका हिचा मृत्यू झालेला होता, तर अत्यवस्थ असलेल्या मुकुंदला तातडीने नगरच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

दरम्यान, या प्रकरणी मुलीच्या आईने आपल्या मुलीच्या मृत्यूला मुकुंद हाच जबाबदार असल्याची तक्रार नगर तालुका पोलीस ठाण्यात दिली आहे. पोलिसांनी त्याच्या विरोधात अवंतिकाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. नगर तालुका पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Intro:अहमदनगर- तरुण-तरुणीने घेतला गळफास
युवतीचा मृत्यू तर युवक अत्यवस्थ..
Body:अहमदनगर- राजेंद्र त्रिमुखे
Slug-
mh_ahm_lovers_susaied_attemt_2019__vij1_7204297

अहमदनगर- तरुण-तरुणीने घेतला गळफास
युवतीचा मृत्यू तर युवक अत्यवस्थ..

अहमदनगर- जामखेड रोडवर चिंचोडी पाटील शिवारात रस्त्याच्या कडेला असलेल्या एका बंद असलेल्या हॉटेल मधे बीड जिल्ह्यातील कडा येथील तरुण-तरुणीने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला, त्यात तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला असून युवक अत्यवस्थ आहे. प्रेमसबंधास विरोध असल्याने दोघांनी आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याची चर्चा आहे. मात्र मृत मुलीच्या आईच्या तक्रारी वरून युवका विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.
याबाबत मिळालेली हकीकत अशी की कडा (ता-आष्टी, जि-बीड) येथील मुकुंद बाबासाहेब भोजने आणि अवंतिका रघुनाथ दळवी या दोघांनी नगर-जामखेड रोड वरील चिंचोडी पाटील शिवारातील अनेक दिवसांपासून बंद पडलेल्या एका हॉटेल मध्ये रात्री गळफास लावून घेतला. तत्पूर्वी मुकुंद ने आपल्या भावास फोन करून आंतरजातीय प्रेमसबंधास विरोध होत असल्याने आपण आत्महत्या करत असल्याचे कळवले होते. त्याने आपण कुठे आहोत हे पण कळवले होते. त्यामुळे मुकुंदच्या घरच्यांनी परिसरात शोध घेतला असता त्यांना बंद हॉटेल मधे दोघेही गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत आढळले. यात मुलगी अवंतिका ही मृत झालेली होती तर अत्यवस्थ असलेल्या मुकुंदला तातडीने नगरच्या एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. दरम्यान मुलीच्या आईने आपल्या मुलीच्या मृत्यूस मुकुंद हाच जबाबदार असल्याची तक्रार नगर तालुका पोलीस ठाण्यात दिली असून पोलिसांनी त्याच्यावर अवंतीकला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी आयपीसी 306 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.. नगर तालुका पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

-राजेंद्र त्रिमुखे, अहमदनगर.

Conclusion:अहमदनगर- तरुण-तरुणीने घेतला गळफास
युवतीचा मृत्यू तर युवक अत्यवस्थ..
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.