ETV Bharat / state

...आणि अखेर चिमुरडीने प्राण सोडला, सर्पदंश झालेल्या अक्षराला वेळीच उपचार मिळालाच नाही

औरंगाबाद जिल्ह्यातून उसतोडणीसाठी नगर जिल्ह्यात आलेल्या कुटुंबातील पाच वर्षीय अक्षरा अनिल राठोड या चिमुरडीला सर्पदंश झाल्यानंतर वेळीच उपचार न झाल्याने मृत्यू झाला. जिल्हा रुग्णालयाने केलेली हेळसांड याला कारणीभूत असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

सर्पदंश झालेल्या अक्षराला वेळीच उपचार न मिळाल्याने तीचा मृत्यू झाला
author img

By

Published : Dec 12, 2019, 11:05 PM IST

Updated : Dec 12, 2019, 11:58 PM IST

अहमदनगर - औरंगाबाद जिल्ह्यातून ऊसतोडणीसाठी नगर जिल्ह्यात आलेल्या कुटुंबातील पाच वर्षीय अक्षरा अनिल राठोड या चिमुरडीला सर्पदंश झाल्यानंतर वेळीच उपचार न मिळाल्याने आपला जीव गमवावा लागला. नगरच्या जिल्हा रुग्णालयाची अक्षम्य हेळसांड याला जबाबदार असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात जागा उपलब्ध नसल्याने खासगी रुग्णालयात जाण्याचा सल्ला त्यांना देण्यात आला. खासगी रुग्णालयात सुद्धा दखल न घेतल्याने पाच वर्षीय अक्षराचा दुर्दैवाने मृत्यू झाला. याप्रकारामुळे आई-वडिलांनी आणि नातेवाईकांनी टाहो फोडला. यावर बोलण्यास रुग्णालयाचे वरिष्ठ तयार नाहीत.

सर्पदंश झालेल्या अक्षराला वेळीच उपचार न मिळाल्याने तीचा मृत्यू झाला

हेही वाचा - शिर्डीत एकाच कुटुंबातील चौघांना विषबाधा; बहीण-भावाचा मृत्यू

बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास राहुरी तालुक्यातील जांभळी या ठिकाणी ऊस तोडणी मजूर कुटुंबातील अक्षरा अनिल राठोड या पाच वर्षीय चिमुरडीला सर्पदंश झाला. त्यानंतर तिला कुटुंबातील सदस्य, स्थानिक ग्रामस्थ, संगमनेर साखर कारखान्याचे कर्मचारी यांनी तातडीने खासगी वाहनातून नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात आणले. मात्र, यावेळी जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात जागा उपलब्ध नसल्याचे कारण देत रुग्णाला खासगी रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानंतर शहरातील तीन ते चार खासगी रुग्णालयात गेल्यानंतर कोणत्याही रुग्णालयाने दाखल करून घेण्यास असमर्थता दाखवली. अखेर अक्षराला पुन्हा जिल्हा शासकीय रुग्णालयात आणण्यात आले. यावेळी नातेवाईकांनी संताप व्यक्त केल्यानंतर तिला दाखल करून घेण्यात आले. मात्र, त्यानंतर केवळ पंधरा मिनिटांनी तिचा मृत्यू झाला.

सुरुवातीला जिल्हा रुग्णालयात आणले त्याचवेळी अक्षरा पूर्ण शुद्धीत होती. मात्र, तिच्यावर वेळेत उपचार सुरू होऊ न शकल्याने तिचा मृत्यू झाल्याचे समोर येत आहे. शासकीय रुग्णालयाचा हेळसांडपणा आणि खासगी रुग्णालयांची असंवेदनशीलता यात एका चिमुरडीने आपले प्राण गमावले आहेत. या सर्व प्रकरणाची चौकशी व्हावी आणि शासकीय रुग्णालयातील दोषींवर कारवाई व्हावी, अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे.

हेही वाचा - अहमदनगरच्या शेवगावात दरोडा, दोन गंभीर जखमी

Intro:अहमदनगर- ..आणि अखेर चिमुरडीने प्राण सोडला, सर्पदंश झालेल्या अक्षराला वेळीच उपचार मिळालाच नाही.

Body:अहमदनगर- राजेंद्र त्रिमुखे
Slug-mh_ahm_01_snek_bite_beath_vis_7204297

अहमदनगर- ..आणि अखेर चिमुरडीने प्राण सोडला, सर्पदंश झालेल्या अक्षराला वेळीच उपचार मिळालाच नाही.

अहमदनगर- औरंगाबाद जिल्ह्यातून ऊसतोडणीसाठी नगर जिल्ह्यात आलेल्या कुटुंबातील पाच वर्षीय अक्षरा अनिल राठोड या चिमुरडीला सर्पदंश झाल्यानंतर वेळीच उपचार न मिळाल्याने आपला जीव गमवावा लागला. नगरच्या जिल्हा रुग्णालयाची अक्षम्य हेळसांड याला जबाबदार असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला असून जिल्हा रुग्णालयात अतिदक्षता विभागात जागा उपलब्ध नसल्याने खाजगी दवाखान्यात जाण्याचा सल्ला आणि खासगी दवाखान्यात सुद्धा दाखल न करून घेतल्याने पाच वर्षीय अक्षराचे प्राण गेल्याचे आईवडिलांनी आणि नातेवाईकांनी टाहो फोडत सांगितले आहे . विशेष म्हणजे यावर बोलण्यास रुग्णालयाचे वरिष्ठ सध्या तयार नाहीत काल बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास नगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील जांभळी या ठिकाणी ऊस तोडणी मजुर कुटूंबातील अक्षरा अनिल राठोड या पाच वर्षीय चिमुरडीला सर्पदंश झाला. त्यानंतर तिला कुटुंबातील सदस्य, स्थानिक ग्रामस्थ, संगमनेर साखर कारखान्याचे कर्मचारी यांनी तातडीने खाजगी वाहनातून नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात आणले. मात्र यावेळी जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात जागा उपलब्ध नसल्याचे कारण देत रुग्णाला खाजगी रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानंतर शहरातील तीन ते चार खासगी रुग्णालयात गेल्या नंतर कोणत्याही रुग्णालयाने दाखल करून घेण्यास असमर्थता दाखवली. अखेर अक्षराला पुन्हा जिल्हा शासकीय रुग्णालयात आणण्यात आले. यावेळी नातेवाईकांनी संताप व्यक्त केल्यानंतर तिला दाखल करून घेण्यात आले. मात्र त्यानंतर केवळ पंधरा मिनिटांनी तिचा मृत्यू झाला. सुरुवातीला जिल्हा रुग्णालयात आणले वेळी अक्षरा पूर्ण शुद्धीत होती. मात्र तिच्यावर वेळेत उपचार सुरू होऊन शकल्याने तिचा मृत्यू झाल्याचे समोर येत आहे. शासकीय रुग्णालयाचा हेळसांडपणा आणि खाजगी रुग्णालयांची असंवेदनशीलता यात एका चिमुरडीने आपले प्राण गमावले आहेत. या सर्व प्रकरणाची चौकशी व्हावी आणि शासकीय रुग्णालयातील दोषींवर कारवाई व्हावी अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे.

बाईट-
१) नातेवाईक
२) विजय शंकर राठोड - चुलते
३)राजाराम धुळगंडे - कर्मचारी, संगमनेर साखर कारखाना

-राजेंद्र त्रिमुखे, अहमदनगर

Conclusion:अहमदनगर- ..आणि अखेर चिमुरडीने प्राण सोडला, सर्पदंश झालेल्या अक्षराला वेळीच उपचार मिळालाच नाही.
Last Updated : Dec 12, 2019, 11:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.