अहमदनगर - राज्यपालांनी आम्हाला सत्ता बहुमत सिद्ध करण्यासाठी 30 तारखेपर्यंतचा अवधी दिला आहे. येत्या 30 तारखेपर्यंत मोठ्या फरकाने आम्ही सरकार स्थापन करु असा विश्वास माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला. तसेच शरद पवार यांनी अजित पवार यांच्यावर केलेली कारवाई हा त्यांचा पक्षांतर्गतचा प्रश्न असून त्यावर भाष्य करणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
शनिवारी राधाकृष्ण विखे पाटील यांनी सहपत्नीक शिर्डी येथे साईबाबांचे दर्शन घेतले. यावेळी विखें पाटील यांनी साईबाबांची पद्य पूजा केली. त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलले.
शिवसेनेने महायुतीचा धर्म पाळायला हवा होता. मात्र, दुर्दैवाने तो पळला गेला नाही. राज्यातील जनतेनी भाजपला मोठा जनादेश दिला असून, आम्हाला खात्री होती की, भाजपचे सरकार येणार आहे. अजित पवार यांनी शरद पवार यांच्या पाठित खंजिर खुपसले असल्याची टिका संजय राऊत यांनी केली आहे. याचे आत्मपरीक्षण राऊत यांनी करण्याची गरज असल्याचे विखे म्हणाले. महायुतीचा आधार घेऊन राज्यात शिवसेनेला जागा मिळाल्याचे विखे म्हणाले.