ETV Bharat / state

अहमदनगरमध्ये झाडावर लटकलेल्या अवस्थेत आढळला बिबट्याचा मृतदेह

author img

By

Published : Apr 25, 2020, 5:32 PM IST

बेल्हेकरवाडी शिवारातील नामदेव बेल्हेकर हे सकाळी शेतात गेले असता त्यांना बिबट्या झाडावर अडकलेला दिसला. त्यांनी शहानिशा केल्यानंतर बिबट्या मृत असल्याचे समजले. त्यानंतर त्यांनी वनविभागाला माहिती दिली. माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

leopard dead body ahmednagar  newase ahmednagar  leopard ahmednagar news  बिबट्या मृतदेह अहमदनगर  अहमदनगर लेटेस्ट न्युज
अहमदनगरमध्ये झाडावर लटकलेल्या अवस्थेत आढळला बिबट्याचा मृतदेह

अहमदनगर - जिल्ह्यातील नेवासे तालुक्यातील वेल्हेकर वाडी येथे झाडावर लटकलेला बिबट्याचा मृतदेह आढळून आला आहे. रात्रीच्या वेळी झाडावर चढलेल्या बिबट्याला खाली उतरता आले नाही. त्यामुळे तो झाडावर अडकून पडल्याने त्याचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज वनविभागाकडून वर्तविण्यात आला आहे.

बेल्हेकरवाडी शिवारातील नामदेव बेल्हेकर हे सकाळी शेतात गेले असता त्यांना बिबट्या झाडावर अडकलेला दिसला. त्यांनी शहानिशा केल्यानंतर बिबट्या मृत असल्याचे समजले. त्यानंतर त्यांनी वनविभागाला माहिती दिली. माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा केल्यानंतर हा बिबट्या रात्री झाडावर चढला असता उतरताना त्याचे पाय दोन फाद्यांच्यामध्ये अडकल्याने रात्रभर झाडावर अडकून पडला. त्यामुळे त्याचा तडफडत मृत्यू झाल्याचा अंदाज वनविभागाकडून व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, बिबट्याचा मृतदेह खाली उतरवून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. त्यानंतर बिबट्याचा मृत्यू कशामुळे झाला? हे स्पष्ट होईल.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.