ETV Bharat / state

Leopard Attack On Women : धक्कादायक... झोपलेल्या महिलेला बिबट्याने नेले उचलुन; महिला ठार - बिबट्याचा हल्ला

अहमदनगर जिल्ह्यात महिलेला उचलुन बिबट्याने उटलुन नेल्याची घटना ( Leopard attack ) घडली आहे. कोकणेवाडी येथील ठाकर वस्तीवर झोपलेल्या रखमाबाई तुकाराम खडके या अपंग महिलेस पहाटे चार वाजता बिबट्याने जंगलात नेऊन ठार केले ( Leopard attack on women ) आहे.

झोपलेल्या महिलेला बिबट्याने नेले उचलुन
झोपलेल्या महिलेला बिबट्याने नेले उचलुन
author img

By

Published : Nov 24, 2022, 8:17 PM IST

अहमदनगर - जिल्ह्यातील कोकणेवाडी येथील ठाकर वस्तीवर एका महिलेला बिबट्याने उचलुन नेल्याची ( Leopard attacks women ) घटना घडली आहे. शेळ्या बांधलेल्या पडवीत झोपलेली रखमाबाई तुकाराम खडके या अपंग महिलेस पहाटे चार वाजता बिबट्याने आपल्या जबड्यात पकडुन जंगलात नेऊन ठार केले ( Leopard attack on women ) आहे. या महिलेच्या भाचेसूनाच्या लक्षात येताच तिने आरडाओरडा केला. कोकणेवाडी गावात घटनेचे वृत्त कळताच सकाळी सहा वाजता ग्रामस्थांनी हातात काठ्या घेऊन जंगल शोधले असता रखमाबाई खडके हीचा मृतदेह आढळून आला.

झोपलेल्या महिलेला बिबट्याने नेले उचलुन

रखमाबाई शेळ्या बांधलेल्या दारात झोपल्या होत्या - अकोले तालुक्यातील कोकणेवाडी शिवारात खडके वस्ती जवळ खडके कुटुंब राहते. धरणग्रस्त असल्याने एका खडकाळ माळरानावर त्यांनी शेती फुलवली आहे. सोबत दहा शेळ्या ते सांभाळतात. काल दुपारी रखमाबाई यांनी शेळ्या शेतात सोडल्या असताना चार वाजता बिबट्याने एका शेळीवर झडप मारून शेळी जंगलात ओढून नेले. याबाबत सायंकाळी जेवण झाल्यानंतर रखमाबाई शेळ्या बांधलेल्या दारात झोपल्या होत्या. पहाटे चार वाजता बिबट्याने रखमाबाईवर हल्ला करुन त्यांना जंगलात ओढून नेले.

Leopard Attack On Women
महिलेला सोधतांना ग्रामस्त

मृतदेह छिन्न अवस्थेत - रखमाबाई यांच्या आवाजाने त्यांची भाचेसून जागी झाल्या. त्यांनी बाहेर येऊन पाहतास बिबट्या रखमाबाईंना घेऊन जात असल्याचे त्यांनी पाहिले. त्यांनी कुटूंबाला जागे करीत गावात फोन करून ग्रामस्थांना बोलविले. ग्रामस्तांनी जंगलात महिलेचा शोध घेतला असता महिलेचा मृतदेह छिन्न अवस्थेत दिसला. या बाबत पोलीस तसेच वनविभागाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. मृताचा अकोले ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

अकोले तालुक्यात ऊस क्षेत्रात मोठ्या प्रमाणात असल्याने - बिबट्याचा उपद्रव वाढला असून या आठवड्यात दहा शेळ्या, जनावरे, कोंबड्या यांचा फडशा पाडला असून माणसांवर हल्ले होत आहे. परिसरातील ग्रामस्थ या गटनेने भयभीत झाले आहे. बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाने तातडीने पिंजरा लावावा अशी मागणी ग्रामस्थ करत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.