ETV Bharat / state

पाणीपुरी खाताय..? सावधान; नगरमध्ये आढळल्या पाणीपुरीत अळ्या - अन्न-औषध प्रशासन विभाग

अहमदनगर शहरात एका पाणीपुरी विक्रेत्याच्या पाणीपुरीमधे अळ्या आढळल्याने संताप व्यक्त होत आहे. अनेक पाणीपुरी विक्रेते नागरिकांच्या जीवाशी खेळ करत असल्याची बाब या निमित्ताने समोर आली.

नगरमध्ये आढळल्या पाणीपुरीत अळ्या
author img

By

Published : Aug 17, 2019, 10:49 PM IST

अहमदनगर - शहरात एका परप्रांतीयाच्या पाणीपुरीमधे अळ्या आढळल्याने संताप व्यक्त होत आहे. नेप्ती चौकातील एका हातगाडीवर पाणीपुरी विकली जात होती.

नगरमध्ये आढळल्या पाणीपुरीत अळ्या
आज (शनिवार) दुपारी काही तरुण पाणीपुरी खात असताना त्यांना पाणीपुरीतील पाण्यात जिवंत अळ्या आढळून आल्या. तरुणांनी ही बाब पाणीपुरीवाल्याच्या लक्षात आणून दिल्यावर त्याने माफी मागत, हे पाणी तीन दिवसांपूर्वीचे असल्याचे कबूल केले. चूक मान्य करत त्याने रस्त्यावरच गाडी सोडून पळ काढला. अनेक पाणीपुरी विक्रेते नागरिकांच्या जीवाशी खेळ करत असल्याची बाब या निमित्ताने समोर आली. पाणीपुरी विक्रेते अशुद्ध पाण्यात पाणीपुरीचे साहित्य तयार करत असल्याचे बोलले जात आहे. महानगरपालिका आणि अन्न-औषध प्रशासन विभागाने शहरातील पाणीपुरीसह विविध खाद्य पदार्थांच्या गाड्यांवरील खाद्यपदार्थ तपासून कारवाई करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.

Intro:अहमदनगर- पाणी पुरी खाताना सावधान.. नगर मधे ठेल्यावरील पाणीपुरीत अळ्या !!Body:अहमदनगर- राजेंद्र त्रिमुखे
Slug-
mh_ahm_worm_in_panipuri_vij_7204297

अहमदनगर- पाणी पुरी खाताना सावधान.. नगर मधे ठेल्यावरील पाणीपुरीत अळ्या !!

अहमदनगर- नगर मधे एका परप्रांतीयाच्या पाणीपुरी मधे अळ्या आढळल्याने संताप व्यक्त होत आहे. नेप्ती चौकातील एका ठेल्यावर पाणीपुरी विकली जात होती. आज दुपारी काही तरुण ही पाणीपुरी खात असताना त्यांना पाणीपुरीतील पाण्यात चक्क जिवंत अळ्या आढळून आल्या. तरुणांनी ही बाब पाणीपुरीवाल्याच्या लक्षात आणून दिल्यावर त्याने माफी मागत हे पाणी तीन दिवसांपूर्वीचे असल्याचे कबूल केले. चूक झाली असे सांगत त्याने रस्त्यावरच ठेला सोडून धूम ठोकली. नागरिकांच्या जीवाशी खेळ करणारे अनेक परप्रांतीय पाणीपुरी असल्याची बाब या निमित्ताने पुढे येत असून एकाच ठिकाणी अशुद्ध पाण्यात पाणीपुरीचे साहित्य तयार होत असल्याचे बोलले जातेय.. महानगरपालिका आणि अन्न-औषध विभागाने शहरातील पाणीपुरीसह विविध खाद्य पदार्थांच्या गाड्यावरील खाद्य तपासून कारवाई करावी अशी मागणी होत आहे..

-राजेंद्र त्रिमुखे, अहमदनगर.Conclusion:अहमदनगर- पाणी पुरी खाताना सावधान.. नगर मधे ठेल्यावरील पाणीपुरीत अळ्या !!
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.