ETV Bharat / state

शिर्डीच्या साई मंदिरात कृष्ण जन्माष्टमी उत्साहात साजरी

author img

By

Published : Aug 12, 2020, 1:25 PM IST

श्रीकृष्ण जन्माचा उत्सव साजरा करण्याची प्रथा गेल्या अनेक वर्षांपासून शिर्डीच्या साई मंदिरात सुरू आहे. यावर्षीही कोरोनाच्या सावटाखाली श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव साजरा केला गेला. चांदीच्या पाळण्यात कृष्णाची मूर्ती ठेवून बाल कृष्णाचे गुणगान केले गेले.

Saibaba
साईबाबा

अहमदनगर - देशभरात कोरोनाच्या सावटाखाली श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव साजरा केला जात आहे. शिर्डीच्या साईबाबा मंदिरातही हा उत्सव मोठ्या श्रध्देने आणि उत्साहात साजरा करण्यात आला. साईबाबांच्या मंदिरात चांदीच्या पाळण्यात श्रीकृष्णाची मूर्ती ठेवून बाल कृष्णाचे गुणगान केले गेले. रात्री बारा वाजता श्रीकृष्ण जन्माचा उत्सव साजरा करण्याची प्रथा गेल्या अनेक वर्षांपासून शिर्डीच्या साई मंदिरात सुरू आहे.

शिर्डीच्या साई मंदिरात जन्माष्टमी साजरी

साईबाबांना श्रीकृष्णाचा अवतार मानत या दिवशी साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी आणि दहीहंडीचा उत्सव साजरा करण्यासाठी असंख्य भाविक साई दरबारी हजेरी लावतात. मात्र, यंदा कोरोनामुळे साईबाबा मंदिर गेल्या 17 मार्चपासून भाविकांना दर्शनासाठी बंद असल्याने यंदाचा भाविकांच्या शिवाय जन्माष्टमीचा उत्सव साजरा करण्यात आला. साई मंदिरात किर्तन पार पडल्यानंतर रात्री बारा वाजता कृष्ण जन्मोत्सव साजरा करून शेजारती करण्यात आली.

गोपाळकाल्याच्या दिवशी दिवसभर साईसमाधीवर गोपाल कृष्णाचा फोटो ठेवून त्याची पूजा केली जाते. साईबाबांनी आपल्या जीवन काळात अनेक लिला दाखवल्या. साईबाबांनी एका भक्ताला कृष्णाच्या रुपात दर्शन दिल्याचे म्हणले जाते. त्यामुळे कित्येक वर्षांपासून शिर्डीत कृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.