ETV Bharat / state

तुम्हाला 'मोफत पतंग' पाहिजे! तर 'या' गमतीशीर अटी पूर्ण करा अन् मिळवा पतंग - मोफत पतंग

Free kites To school Students: मकर संक्रांतीला तुम्हाला मोफत पतंग मिळाली तर तुम्हाला किती आनंद होईल ना! (Makar Sankranti 2024) अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील वारी येथील पतंगोत्सवप्रेमी नवनाथ कवडे हे बालगोपाळांसाठी गेल्या नऊ वर्षांपासून मोफत पतंग वितरणाचा उपक्रम राबवित आहे. यासाठी त्यांनी गमतीशीर अटीही ठेवल्या आहेत. त्या पूर्ण केल्या की शालेय विद्यार्थ्यांना मोफत पतंग दिली जाते. (Conditions for Free Kites)

Navnath Kawade
नवनाथ कवडे
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 15, 2024, 7:44 PM IST

मोफत पतंग वितरणामागील उद्देश सांगताना पतंग उत्सव आयोजक नवनाथ कवडे

वारी (अहमदनगर) Free kites To school Students : मकर संक्रांत म्हटली की आपसूक पतंगोत्सव समोर येतो आणि मग काय पतंग, दोरा, आसरी घेऊन सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत लहानापासून मोठ्यापर्यंत आपला पतंग आकाशात पक्षांप्रमाणे कसा भिरभिरत राहील याचीच आनंददायी स्पर्धा सुरू असते. (Kite School Students) याच स्पर्धेत जर तुम्हांला मोफत पतंग हवा असेल तर मग “पाढे म्हणा, राष्ट्रगीत म्हणा, प्रतिज्ञा म्हणा, सामान्य ज्ञानाच्या प्रश्नांची उत्तरं द्या नाहीतर उठक-बैठक काढा अन् मोफत पतंग घेऊन जात आनंद लुटा,” अशी मजेशीर पर्वणी दिली जाते.

शालेय विद्यार्थ्यांना मोफत पतंग वाटप: मोफत पतंग मिळविण्यासाठी तुम्हाला कोपरगाव तालुक्यातील वारी येथील उत्सवप्रेमी नवनाथ कवडे यांनी बालगोपाळांसाठी गेल्या नऊ वर्षांपासून मकर संक्रांतीला सुरू केलेल्या अनोख्या उपक्रमाला भेट द्यावी लागेल. विशेष म्हणजे, कवडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देशा प्रतीच्या कार्यानं प्रेरित होऊन या उपक्रमाला “मोदी फ्री पतंग” असं नाव देण्यात आलं आहे. या उपक्रमात शालेय वयोगटातील विद्यार्थ्यांना अगदी मोफत पतंगाचं वितरण केलं जातं. मात्र, त्यासाठी काही गंमतीशीर अटी ठेवण्यात आल्या आहेत.

काय आहेत उत्सवाच्या अटी? बरं का, आता या अटी आहे तरी काय? बघूया. ज्या विद्यार्थ्याला मोफत पतंग हवा आहे त्याने सर्वप्रथम पतंग मिळतात त्या ठिकाणी यायचे आहे. तेथे आल्यानंतर तेथे उपस्थित असलेले नवनाथ कवडे हे गंमत म्हणून त्या विद्यार्थ्याची मुलाखत घेतात. या मुलाखतीमध्ये सर्वप्रथम स्वतःचा परिचय असतो. तो दिल्यानंतर आपल्याला पतंग मिळणार असं विद्यार्थ्यांना वाटते. परंतु, तसं होत नाही. मग सुरू होतो पुढचा टप्पा आणि त्यात पाढे, राष्ट्रगीत, प्रतिज्ञा, वंदे मातरम्‌, शालेय पुस्तकातील प्रतिज्ञा म्हणायला सांगितले जाते. यासह सामान्यज्ञान म्हणून देशाचे राष्ट्रपती कोण?, पंतप्रधान कोण?, राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कोण? असे एक न अनेक प्रश्न विचारले जातात. ज्यांना उत्तरे येतात त्यांना मोफत पतंग दिली जाते आणि ज्यांना येत नाही त्यांनाही दिली जातात. मात्र, त्यासाठी विद्यार्थ्यांना गंमत म्हणून उठक-बैठक काढावी लागते. त्यावर काही मुले प्रश्नांपेक्षा आम्ही उठक-बैठक मारतो, अशा भूमिकेत असतात.

बाळगोपाळ घेतात आनंदाने लाभ: आता पतंग दिल्यानंतर तो पुन्हा आल्यावर कसा ओळखायचा म्हणून विद्यार्थ्याने स्वःहस्तक्षरात त्याचे नाव लिहायचे आहे. एवढ्यावरच न थांबता निवडणूक प्रक्रियेत मतदान केल्यानंतर जशी बोटाला शाई लावतात अगदी तशीच शाई लावली जाते. त्यामुळे पुन्हा आला तरी लक्षात येतो. या गमतीदार उपक्रमाचे शेकडो बालगोपाळ आनंदात लाभ घेतात. गेल्या दोन दिवसात दोन हजार पेक्षा जास्त पतंगांचे वाटप झाले आहे. विशेष म्हणजे, पतंग मिळण्याचे ठिकाण लक्षात येण्यासाठी बाहेर मोठा पतंग लावण्यात आला आहे.

गमतीदार उत्तरातून हास्य दरवळते: हा उपक्रम गेल्या आठ वर्षांपासून गंमत म्हणून सुरू केला आहे. यात लहान मुलांचा सहवास लाभतो. पुढची पिढी म्हणून ही मुलं कोणाची आहेत याचा देखील परिचय होतो. विशेष म्हणजे, ज्यावेळी मुलांची मुलाखत घेतो तेव्हा, मुलांच्या गंमतीदार उत्तरातून हास्य दरवळते. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे, उत्तरं आली नाही तरी उठकबैठक काढून का होईना, पतंग घेऊनच जाणार या जिद्दीमुळे काहीसा आनंदही मिळतो. त्यामुळे उपक्रमात एका संक्रांतीला आठ दिवसात सुमारे ४ हजार पेक्षा जास्त पतंगाचे मोफत वाटप केले जात असल्याची माहिती नवनाथ कवडे यांनी दिली आहे.

हेही वाचा:

  1. भाजपा-संघ परिवाराची महत्वाची बैठक; लोकसभा, विधानसभा निवडणुकांची 'स्ट्रॅटेजी' ठरली?
  2. उद्धव ठाकरेंची मंगळवारी 'महापत्रकार परिषद'; आशिष शेलार म्हणाले 'बालिशपणा'
  3. अमिताभ बच्चन यांनी घर बांधण्यासाठी अयोध्येत खरेदी केली जमीन; किंमत जाणून बसेल धक्का

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.