अहमदनगर: या गुन्ह्याचा तपास करत असताना घारगाव शिवारात रात्रीच्या वेळी पुणे-नाशिक रोड वर असलेल्या लक्ष्मी टायर पंक्चर दुकानात प्रवेश करून चाकूचा धाक दाखवून पैसे आणि मोटर सायकल चोरून बळजबरीने चोरून नेली होती. त्याच तीन जणांना टोळीने साकुर ते मांडवा रोडवरील भगवान पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना चाकूचा आणि गावठी कट्ट्याचा धाक दाखवत 250747 रुपयाची रोख रक्कम चोरून नेली होती.
तांत्रिक विश्लेषणाद्वारे तपास: पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी घडलेल्या घटनेच्या ठिकाणी भेट देऊन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना स्थानिक गुन्हे शाखेचे स्वतंत्र पथके नेमून समांतर तपास करण्याचे आदेश दिले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रेकॉर्ड वरील गुन्हेगाराची माहिती संकलित करत तपास सुरू केला. अहमदनगर शहर आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपास करत तांत्रिक विश्लेषणाद्वारे तपास करत होते. गुप्त बातमीदार यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार ही तीन घटनेतील आरोपी हे घरी आले आहेत आणि आता गेल्यास मिळून येतील. ही माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून अजय चव्हाण या आरोपीला ताब्यात घेतले. नंतर इतर दोन साथीदारांना देखील शिताफीने पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी केलेल्या सूक्ष्म चौकशीनंतर आरोपींनी गुन्हा केल्याची कबुली पोलिसांना दिली. व्यसनाधीनता करणारी तरुण मुले गुन्हेगारीकडे वळत असल्याचे चित्र जाणवत आहे.
मोबाईल चोरीतील आरोपीला अटक: अहमदनर जिल्ह्यातून गुन्हेगारीची बातमी समोर आली होती. मोबाईल चोरी केली म्हणून शहराजवळील धोत्री शिवारात 30 वर्षीय तरूणाचा खूनाची घटना २४ ऑक्टोबर, 2022 रोजी घडली होती. जामखेड पोलिसांनी या खुनाचा छडा लावत एका आरोपीला 24 नोव्हेंबर, 2022 रोजी अटक केली होती.
मोबाईल चोरणाऱ्याला निर्घृण मारहाण: पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली की, जामखेड तालुक्यातील धोत्री शिवारातील कापूस जिनिंग मिलच्या गेटवर २४ ऑक्टोबर रोजी बीडच्या गेवराई तालुक्यातील संगमजळगाव गावातील गणेश शिवाजी वारे (वय 30) या तरूणाचा मृतदेह आढळून आला होता. मयत तरुणाच्या पोटावर, पाठीवर, छातीवर, डोक्यावर, हातावर व पायावर काहीतरी टनक हत्याराने जबर मारहाण करुन जीवे ठार मारल्याचे निष्पन्न झाले होते. या खून प्रकरणी मयताचे वडील शिवाजी मारुती वारे यांनी जामखेड पोलिस स्टेशनला अज्ञात आरोपींविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल केला होता. या घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक सुनिल बडे यांनी अवघ्या १५ दिवसात केला.