ETV Bharat / state

Kedar Dighe on CM Eknath Shinde देवळात देव राहिल्याशिवाय देवळाला महत्त्व येत नाही, केदार दिघेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

author img

By

Published : Aug 18, 2022, 8:56 AM IST

Updated : Aug 18, 2022, 9:07 AM IST

Kedar Dighe on CM Eknath Shinde शिंदे गटाकडून प्रतिशिवसेना उभे करण्यावरुन आता नवीन वाद निर्माण झाला आहे यावर आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी प्रतिक्रिया दिली आहे

Kedar Dighe on CM Eknath Shinde
Kedar Dighe on CM Eknath Shinde

शिर्डी ठाणे जिल्हाप्रमुख आणि दिवंगत आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी शिर्डीत येवुन साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले आहे. त्याबरोबरच साईबाबांच्या मध्यान आरतीला हजेरी लावली आहे. साईबाबांच्या दर्शनानंतर केदार दिघे यांनी शिर्डीत पत्रकारांशी संवाद साधला आहे. प्रतिशिवसेना भवनावरुन दिघे यांनी शिंदे गटावर निशाणा साधला. ज्या देवळात देव नाही तीथे कुणाची श्रद्धा असणार ? Kedar Dighe on CM Eknath Shinde असं म्हणत एकनाथ शिंदे गटाकडून प्रतिशिवसेना उभारण्याच्या निर्णयावर केदार दिघे यांनी टिका केली आहे.

बाळासाहेबांनी सेना भवनाची वीट रचली आनंद दिघेंप्रमाणे माझ्या हातून लोकांची सेवा घडावी, अशी प्रार्थना साई चरणी केली आहे. मी दिघे साहेबांचा पुतण्या बाळासाहेबांचे कडवट विचार माझ्या रक्तात असल्याचं दिघे यांनी म्हटलं आहे. देवळात देव राहिल्याशिवाय त्या देवळाला महत्त्व येत नाही. बाळासाहेबांनी सेना भवनाची वीट रचली. त्यामुळे तिकडे लोक आस्थेने येतात. वेगळं नाव देऊन काहीही रचले तरी सेनाभवन आणि मातोश्रीचे महत्त्व तेच राहाणार असल्याचं केदार दिघे यांनी म्हटलं आहे. Kedar Dighe on CM Eknath Shinde शिवसेनाही बाळासाहेबांची आणि शिवसैनिकांची आहे. बाळासाहेबांनंतर सर्वसामान्य शिवसैनिकांचा उद्धव ठाकरेंवर विश्वास असून यापुढे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर विश्वास ठेवूनच शिवसेना पुढे जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

अनेकांनी खारीचा वाटा उचलला शिवसेना आणि शिवसैनिक जिथे आहे तिथेच आहेत. शिवसेना आणि शिवसैनिकांना संघर्ष नवीन नाही. त्यामुळे व्यासपीठावरून दहा जरी गेले तरी समोरील लाखो करोडो जनता शिवसेनेशी बांधिल असल्याचं केदार दिघे यांनी म्हटलं. धर्मवीर हा एक व्यावसायिक चित्रपट असून दिघे साहेब फक्त तीन चार लोकांमध्ये वावरले नाहीत. दिघे साहेबांनी जवळ घेतल्याने अनेकांच्या आयुष्यात आमूलाग्र बदल झाला असून दिघे साहेबांचे चरित्र फक्त 3 तांसाचे असू शकत नाही. Kedar Dighe on CM Eknath Shinde त्यांचा जीवनपट रेखाटायचा तर त्यावर सिरीज ऑफ इव्हेंट कराव्या लागतील. कारण अनेकांनी खारीचा वाटा उचलला आहे. सर्वांना एकत्र करून खरा जीवनपट बनवला पाहिजे. असं म्हणत धर्मवीर चित्रपटाच्या सत्यतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

हेही वाचा - Thane police seized ivory ठाणे पोलिसांनी हस्तगत केले तब्बल अडीच कोटींचे हस्तिदंत

Last Updated : Aug 18, 2022, 9:07 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.