अहमदनगर - कर्जत तालुक्यात पाऊस कमी पडल्याने दुष्काळजन्य परिस्थिती आहे. आजही लोकांना पिण्याच्या पाण्याचा तुटवडा आहे.
सध्या कुकडी धरणात सध्या मुबलक पाणीसाठा असल्याने धरणातील विसर्गाचे अतिरिक्त पाणी कुकडी कॅनलला सोडून कर्जत तालुक्यातील तलाव, बंधारे भरावेत अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.
राशीन तसेच कर्जत या शहरांना पाणीपुरवठा करणारा थेरवडी तलाव भरल्यास या दोन मुख्य शहरांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटेल, अशी मागणी राशीन ग्रामपंचायतीने केली आहे. यासंदर्भात पालकमंत्री राम शिंदे, प्रांत अधिकारी तसेच तहसीलदार यांना निवेदन दिल्याची माहिती राशिनचे उपसरपंच शंकर देशमुख यांनी दिली आहे.