ETV Bharat / state

खेडकर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर; मुलीनंतर कांताबाई सातारकर यांच्या नातुचंही निधन - kantabai satarkar death sangamner

ज्येष्ठ तमाशा कलावंत कांताबाई सातारकर यांचे निधन होण्यापूर्वी पाच दिवस अगोदर त्यांच्या सर्वात ज्येष्ठ कन्या अनिता उर्फ बेबीताई यांचे उपचारादरम्यान कोरोनाने निधन झाले होते. त्यावेळी कुटुंबातील सर्वच सदस्य संगमनेर येथे उपचार घेत असल्याने बेबीताईंचा मुलगा बबलू हे सहन करू शकेल का? या सगळ्यांचा विचार करून बेबीताईच्या निधनाची बातमी जाहीर केली नव्हती.

kantabai satarkar's daughter and grandson died
खेडकर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर; मुलीनंतर कांताबाई सातारकर यांच्या नातुचंही निधन
author img

By

Published : Jun 2, 2021, 9:25 AM IST

Updated : Jun 2, 2021, 11:33 AM IST

संगमनेर (अहमदनगर) - महाराष्ट्राच्या तमाशा क्षेत्रातील मोठे नाव असलेल्या खेडकर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ज्येष्ठ तमाशा कलावंत कांताबाई सातारकर यांचे नातू अभिजित उर्फ बबलू यांचेही उपचारादरम्यान निधन झाले आहे. याआधी कांताबाई सातारकर यांच्या सर्वात ज्येष्ठ कन्या अनिता उर्फ बेबीताई यांचे निधन झाले होते. यानंतर पाच दिवसातच कांताबाई सातारकर यांचे निधन झाले. आता आई आणि आजीच्या निधनापाठोपाठ बबलू यांचेही निधन झाले. मागील आठ दिवसात कुटुंबातील तिघा जणांच्या मृत्यूने खेडकर कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.

आईच्या निधनाची बातमी दिली नव्हती -

ज्येष्ठ तमाशा कलावंत कांताबाई सातारकर यांचे निधन होण्यापूर्वी पाच दिवस अगोदर त्यांच्या सर्वात ज्येष्ठ कन्या अनिता उर्फ बेबीताई यांचे उपचारादरम्यान कोरोनाने निधन झाले होते. त्यावेळी कुटुंबातील सर्वच सदस्य संगमनेर येथे उपचार घेत असल्याने बेबीताईंचा मुलगा बबलू हे सहन करू शकेल का? या सगळ्यांचा विचार करून बेबीताईच्या निधनाची बातमी जाहीर केली नव्हती. मागच्या आठवड्यात बबलुची तब्येत खालावल्याने त्यांना उपचारासाठी नाशिकला हलवले होते. आज नाशिक येथे उपचारादरम्यान बबलु उर्फ अभिजीत यांचे निधन झाले. गेल्या आठ दिवसात एकामागोमाग एकाच कुटुंबातील नातू, आई, आजी या तिघांचा कोरोनाने बळी घेतला.

दरम्यान, या मृत्यूच्या घटनेच्या निमित्ताने कांताबाई सातारकर यांच्या आयुष्यावरील पुस्तकाचे लेखक डॉ. संतोष खेडलेकर यांनी ईटीव्ही भारतसोबत या तिघांच्या आठवणी शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या.

ते लिहितात, 'धरणीकंप झाला... आभाळ कोसळले'. कांताबाई सातारकर, कन्या अनिता आणि नातू बबलू तिघांचा दुर्दैवी अंत.

"संतोषभाऊ आपला बबल्या गेला..." रघुभाऊ (रघुवीर खेडकर) रडत रडत फोनवर सांगत होते... दुःखालाही दुःख व्हावे, अशा घटना मागच्या पंधरवड्यात एकामागोमाग घडत आहेत. दुःखाची एक लाट ओसरते न ओसरते तोच दुःखाची दुसरी भलीमोठी लाट येऊन सगळ्या भावभावनांचा चुराडा करून टाकताहेत.

25 तारखेला कांताबाई गेल्या ही गोष्ट सर्वश्रुत आहे. मात्र, त्यांचे देहावसान होण्यापूर्वी पाच दिवस अगोदर त्यांच्या सर्वात ज्येष्ठ कन्या अनिता उर्फ बेबीताई कोरोनाने गेल्या होत्या. त्यावेळी कुटुंबातले सर्वच सदस्य दवाखान्यात दाखल असल्याने, विशेषतः रघुभाऊसारख्या हळव्या मनाच्या माणसाला हे दुःख सहन होईल का? बेबीताईंचा दवाखान्यात दाखल असलेला मुलगा बबलू हे सहन करू शकेल का? या सगळ्याचा विचार करून बेबीताई गेल्याची बातमी जाहीर केली नव्हती. मागच्या आठवड्यात बबलुची तब्येत जास्त झाली म्हणून त्याला उपचारासाठी नाशिकला हलवलं होतं. एकामागोमाग दोन मोठे घाव सोसल्यानंतर आता आणखी दुःखद बातमी येऊ नये, असे मनोमन वाटत होते. पण अखेर ती कटू बातमी आलीच. एकामागोमाग एकाच कुटूंबातले नातू, आई, आजी असे तिघेजण गेले. मागची दोन दशके एका कुटुंबाप्रमाणे आम्ही सगळे एकत्र वावरत होतो. प्रत्येकजण एकमेकांशी घट्ट बांधला गेलेला होता. आज हे सगळं सगळं डोळ्यासमोर उभे राहतय. तमाशाबद्दल माहिती आहे, अशा सर्वांनाच बेबीताई माहिती आहे. कांताबाई सातारकर व तुकाराम खेडकर या दोन महान कलाकारांची ज्येष्ठ कन्या म्हणजे आमची अनिताताई उर्फ बेबीताई.

१९६४ मध्ये तुकाराम खेडकर यांचे अचानक निधन झाले. कांताबाईंनी मुलांसह तमाशा फड सोडला. तेव्हा बेबीताई अवघ्या ८-९ वर्षाच्या होत्या. कांताबाईसाठी अनिता हेच भविष्य होते. त्यांनी ४-५ वर्ष कसे बसे इतर तमाशात काम केले. १९६९ पर्यंत अनिताताई नृत्यात, अभिनयात, गाण्यात पारंगत झाल्या होत्या. परिस्थिती माणसाला अधिक समजूतदार बनवते तसेच काहीसे अनिता ताई यांच्या बाबतीत झाले होते. १९६९ मध्ये त्यांनी स्वतःचा तमाशा फड सुरू केला. १३-१४ वर्षे वयाची ही छोटी मुलगी दिवसरात्र कष्ट करीत होती. बेबीताईंनी त्यावेळी आपली चुणूक दाखविली. रायगडची राणी अर्थात पन्हाळगडाचा नजर कैदी हे वगनाट्य कोणत्याही कलाकारांसाठी मोठे आव्हान असायचे यात अनिता खेडकर यांनी नकारात्मक छटा असलेली सोयराबाई यांची भूमिका अशी काही केली की आजही जुने कलाकार सोयराबाई म्हटले की अनिता खेडकर यांचेच नाव घेतात.

डोम्या नाग, कोर्टादारी फुटला चुडा, सोयगाव हत्याकांड, पाच तोफांची सलामी, गवळ्याची रंभा, सख्खा भाऊ पक्का वैरी अशा असंख्य वगनाट्यातुन त्यांनी ग्रामीण महाराष्ट्राला अक्षरशः वेड लावले. राजीव गांधी यांची हत्या झाल्यावर आलेले 'हार फुलांचा फास मृत्यूचा' या वगात एका दक्षिणात्य महिलेचे पात्र साकारताना तिथले हेल काढून बोलणे हे मोठे आव्हान होते. याच वगनाट्याच्या वेळी नांदेड जवळ माळेगावच्या यात्रेत वगात वापरायच्या आपटबारचा स्फोट झाला. हा स्फोट इतका भयंकर होता की स्टेजच्या मागे बसलेला एक सोंगाड्या जागीच ठार झाला तर बेबीताईंचा दोन अडीच वर्षाचा मुलगा बबलू जबर जखमी झाला. बबलूची प्रकृती गंभीर होती पण त्यावेळी त्यांनी मुलाला, आई कांताबाई सातारकर यांच्यासोबत नांदेडला दवाखान्यात पाठवून आपला कलाकार धर्म जपला. स्वतःचं बाळ मृत्यूशी झुंज देत असताना त्या इकडे रंगमंचावर काम करीत होता. कलेशी पक्की बांधिलकी जपणारी कलावती म्हणून त्यांचं नाव त्यादिवशीच जगाच्या रंगभूमीच्या इतिहासात कोरल गेलं हे नक्की.
'सुडाने पेटली फुलन' या वगातली सीआयडी सीता ही भूमिकाही अशीच आव्हानात्मक होती. सीआयडी झालेली सीता एका नाटक कंपनीच्या माध्यमातून फुलनपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करते. यात अनिता खेडकर यांनी नाटकातील चार्ली चाप्लीन असा काही साकारला की प्रेक्षक हसून हसून उलटेपालटे व्हायचे. वगात कॉमेडी करावी ती बेबीताई यांनीच असाही काळ त्यांनी तमाशा सृष्टीत आपल्या अथक प्रयत्नातून आणला होता.

गण झाला की तमाशा खऱ्या अर्थाने सुरू होतो. इथूनपुढची सगळी सूत्र वर्षानुवर्षे बेबीताई सांभाळत होत्या. गणगवळण, रंगबाजी, सांधे, बतावण्या, लावण्या, सिनेमातली गाणी, वग नात्यातील भूमिका या सगळ्यात बेबीताईंनी आपल्या कलेची चुणूक दाखवली. रघुभाऊसोबत मी तमाशाचे अनेक दौरे केले. तमाशाच्या राहुटीत गेलं की बेबीताईची प्रेमळ हाक ठरलेली, 'नमस्कार खेडलेकर बंधू...' मंदाताई, अलकाताई, रघूभाऊ हे सगळे नावाने संबोधतील पण बेबीताई त्यांच्या खास लहेजात बंधू म्हणून हाक मारणार. दरवर्षी राखी पौर्णिमेला बेबीताई त्यांच्या दोन्ही धाकट्या बहिणींसह राखी बांधायला यायच्या. सख्खी बहीण नसल्याची उणीव त्यांनी आजवर भरून काढली.

बेबीताई आणि कांताबाईंच्या जाण्याच्या दुःखातून अजून आम्ही कुणीच सावरलो नव्हतो तोच बेबीताईंचा मुलगा बबलू गेल्याची बातमी आली. बबलू म्हणजे अस्सल तमाशा कलावंत. त्याचे प्रथमदर्शनी रूप बघितले की कुणालाही तो अतिशय आक्रमक व्यक्तिमत्वाचा वाटायचा पण बबलू अतिशय शांत स्वभावाचा. सुस्वभावी.

फार वर्षांपूर्वी अकलूजला ढोलकी फडांचा तमाशा महोत्सव झाला होता. नागपूरचा गुंड अक्कू यादवच्या आयुष्यावर आधारित वगनाट्य बसवले होते. यात आमचा बबलू आणि माझा आवडता सोंगाड्या विनोद अवसरीकर यांच्या हवालदाराच्या भूमिका होत्या. तसे म्हटले तर या भूमिका अगदीच नगण्य. अभिनय करायला आणि छाप पाडायला फारसा वाव नसलेल्या भूमिका. पण बबलूने या भूमिकेत असे काही रंग भरले की वग संपल्यावर अक्कू यादव इतकेच हे दोन्ही हवालदार पक्के लक्षात राहिले.

माळेगावच्या यात्रेचा प्रसंगवर दिला आहे. त्यावेळी बबलू वाचला हा मोठा चमत्कार होता. इतक्या मोठ्या प्रसंगातून बबलूला जीवदान मिळाले. तो खऱ्या अर्थाने मृत्युंजय ठरला पण आज आमच्या मृत्युंजय बबलुला नियतीने आपल्या जबड्यात पकडलेच. बबलूची बायको अमृता, आमची मोठी गोड अशी सूनबाई, लग्नानंतर खूप वर्षांनी या दोघांना मुलगी झाली. आईच रूप आणि बापाची हुशारी घेऊन जन्माला आलेली रेवा सगळ्यांचीच लाडकी. या दोघींच्या दुःखाला पारावर नाही. बेबीताईंची कन्या आणि बबलुची बहीण पूजा. हिने तर एकाच वेळी आई, आजी आणि भाऊ गमावला आहे.
रघूभाऊ, अलकाताई, मंदाताई यांच्यावर तर आभाळच कोसळले आहे. नियतीने किती क्रूर व्हावे? एखाद्या कुटुंबाचा किती अंत बघावा? सगळंच शब्दात वर्णन करण्यापलीकडचे आहे. कुणी कुणाला सावरायचं हाच प्रश्न आहे".

Last Updated : Jun 2, 2021, 11:33 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.