ETV Bharat / state

Janmashtami २०२३ : साईबाबा मंदिरात जन्माष्टमीचा उत्सव; चांदीच्या पाळण्यात श्रीकृष्णाची मूर्ती ठेवून कीर्तन सोहळा

Celebrating Krishna Janmashtami : देशभरात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा (Janmashtami 2023) उत्सव मोठ्या प्रमाणात सुरु आहे. दरम्यान, मध्यरात्री 12 च्या सुमारास श्रीकृष्णाचा जन्म झाला. तर शिर्डीच्या साईबाबा मंदिरातही (Shirdi Saibaba Temple) चांदीच्या पाळण्यात श्रीकृष्णाची मूर्ती ठेऊन रात्री बारा वाजता कृष्ण जन्मोत्सव साजरा करण्यात आला.

Dahi Handi In Shirdi 2023
साईबाबांचा मंदिरात श्रीकृष्ण जन्म उत्सव
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 7, 2023, 7:50 AM IST

Updated : Sep 7, 2023, 12:14 PM IST

शिर्डी - Janmashtami २०२३ : देशभरात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव मोठ्या भक्तिभावात साजरा केला जातो. शिर्डीच्या साईबाबा मंदिरातही हा उत्सव मोठया श्रद्धेने आणि उत्साहात साजरा करण्यात आला. साईबाबांच्या मंदिरात चांदीच्या पाळण्यात श्रीकृष्णाची मूर्ती ठेवून बाल बाळकृष्णाचं गुणगान केलं जातं. रात्री बारा वाजता श्रीकृष्णजन्माचा उत्सव (Krishna Janmashtami) साजरा करण्याची प्रथा गेल्या अनेक वर्षांपासून चालत आली आहे.

श्रीकृष्ण जन्मोत्सव कीर्तन - साईबाबांना श्रीकृष्णाचा अवतार मानत या पावन दिवशी साईबाबांचं (Sai Baba) दर्शन घेण्यासाठी आणि दहीहंडीचा उत्सव साजरा करण्यासाठी असंख्य भाविक साईदरबारी नतमस्तक होतात. साई मंदिरात कीर्तन पार पडल्यावर रात्री बारा वाजता कृष्ण जन्मोत्सव साजरा होऊन, शेजारती करण्यात आली. मध्याह्न आरतीअगोदर बारा वाजता साई समाधीसमोर दहीहंडी (Dahi Handi 2023) फोडली जाते.

चांदीच्या पाळण्यात श्रीकृष्ण - गोकुळाष्टमीच्या दिवशी साईंच्या मंदिरात (Shirdi Saibaba Temple) कृष्ण जन्म आणि दहीहंडीचा उत्सव साजरा करण्यात येतो. चांदीच्या पाळण्यात बाळकृष्णाची मूर्ती ठेऊन श्रीकृष्ण जन्माचं कीर्तन झाल्यानंतर जन्म उत्सव साजरा करण्यात येतो. गोपाळकाल्याच्या दिवशी दिवसभर साई समाधीवर गोपाळकृष्णाचा फोटो ठेवून त्याची पूजा केली जाते. साईबाबांनी आपल्या जीवन काळात अनेक लीला दाखवल्या. साईबाबांनी एका भक्ताला कृष्णाच्या रुपात दर्शन दिल्याची आख्यायिका आहे. राम, रहीम, कृष्ण, विठ्ठल अशा विविध रुपात साईबाबा दर्शन देत असल्याची भाविकांची श्रद्धा आहे.

शिर्डीत भाविकांची गर्दी - जन्माष्टमीच्या निमित्ताने शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. बुधवारपासूनच साईनगरीत भाविकांची मांदियाळी पाहायला मिळाली. साई समाधीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी पहाटेपासूनच रांगा लावायला सुरुवात केली होती.

हेही वाचा -

  1. Corruption Dahi Handi: मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात मनसे कार्यकर्त्यांनी फोडली भ्रष्टाचाराची दहीहंडी, पाहा व्हिडिओ
  2. Dahi Handi 2023: राज्यातील पहिलं 'तृतीयपंथी गोविंदा पथक' पुण्यात; 50 पेक्षा अधिक तृतीयपंथी दहीहंडी फोडण्यास सज्ज
  3. Dahi Handi २०२३ : आला रे आला गोविंदा आला! कोट्यवधींच्या बक्षिसांसोबतच राजकीय कलगीतुरा रंगणार

Last Updated : Sep 7, 2023, 12:14 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.