अहमदनगर: श्रीरामपुर तालुक्यातील वाकडी येथील विक्रांत काले यांनी चांगल्या पगाराची नोकरी सोडून शेती करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी तालुक्यात पहिल्यांदा सफरचंदाची बाग लावून यशस्वी उत्पादन घेतले. त्यानंतर आता पांढऱ्या रंगाची जांभूळ बाग फुलविली आहे. तीन वर्षांपूर्वी 12 बाय 12 फुटावर जांभळाची झाडे लावली होती. यापैकी एकरी 325 झाडे जगली. आता तीन वर्षांनंतर झाडाला जांभळे आली आहेत. त्यांनी फळे काढून साधारण 250 रुपये किलो भावाने विक्री सुरू केली. एका झाडाला पहिल्या वेळी सात ते आठ किलो फळे शिवारात मिळाली. पाच वर्षांनंतर 25 किलो फळे मिळू शकतात, असे काले यांनी सांगितले. जांभूळ झाड 25 वर्षे टिकते. आता त्यांना प्रतिझाड किमान एक हजार रुपये उत्पन्न मिळणार आहे. सध्याचा भाव लक्षात घेता एकरी 25 हजार रुपयांचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे.
'या' वाणावर गारपीटीचा कमी परिणाम: हे जांभूळ कोणत्याही प्रकारच्या जमिनीत व कमी पाण्यात येते. शिवाय फळे पानांच्या आत असल्याने गारपिटीने नुकसान होत नसल्याचा अनुभव त्यांना यावर्षी आला आहे. झाडांची उंची कमी असल्याने तोडणी, फवारणी आणि मशागतीची कामे सोपी होतात. विक्रांत काले यांनी पांढऱ्या जांभळाच्या शेतीतून सध्या एकरी 3 लाख 25 हजार रुपयांचे उत्पन्न घेतले आहे.
मार्केटमध्ये कोणत्या व्हेरायटीजला चांगले भाव मिळते याचा इंटरनेटवर शोध घेतला. यातच जांभूळे हे पारंपरिक आणि बांधावरचे पीक. कमी परिश्रमात आणि पाण्यात येणाऱ्या या पिकाला मार्केटमध्ये चांगली मागणी होती. यातील पांढरे जांभूळ व्हेरायची शोधून मी त्याचे उत्पादन घेण्याचे ठरविले. हे फळपीक कोणत्याही जमिनीत होत असल्याने मी याचे उत्पादन घेतले. - विक्रांत काले, प्रगतिशील शेतकरी
उत्पादन खर्च कमी: पांढरी जांभूळ बाग उभी करण्यासाठी कमी खर्च येतो. ही बाग नैसर्गिक आपत्तीलाही कमी बळी पडते. त्यामुळे कमी खर्चात चांगले उत्पन्न मिळवण्याचा चांगला पर्याय आहे. रोपे उपलब्ध करणे, लागवड तंत्रज्ञान माहिती देणे, विक्री व बाजारपेठ याबाबत आपण इच्छुक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करू असेही काले सांगतात. बाग उभी करण्यासाठी एकदाच मशागत, रोपे, खते, औषधे गृहीत धरून एकरी साधारण दीड ते दोन लाख रुपये खर्च झाल्याचे विक्रांत काले यांनी सांगितले.
हेही वाचा:
- Shevgaon Traders Business Stop: समाजकंटकांनी केलेल्या दंगलीविरुद्ध शेवगाव शहरात व्यापाऱ्यांची 'बंदची हाक'
- Nitin Gadkari Threat Call : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी
- Trimbakeshwar Temple Nashik : त्र्यंबकेश्वर मंदिरात घडलेला प्रकार गंभीर ; देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश