ETV Bharat / state

इंदुरीकर महाराजांनी आपल्या शैलीत सांगितला कोरोनावर उपाय - इंदुरीकर महाराज कोरोना उपाय

राहाता तालुक्यातील लोणी येथे भाजपचे माजीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्यावतीने ४५० खाटांचे 'प्रवरा कोवीड सेंटर' सुरू करण्यात आले आहे. किर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या हस्ते या कोविड सेंटरचे उद्घाटन करण्यात आले.

Indurikar Maharaj solution of Corona
इंदुरीकर महाराज कोरोना उपाय बातमी
author img

By

Published : May 1, 2021, 7:43 AM IST

अहमदनगर - आपल्या किर्तनातून समाज प्रबोधन करण्यासाठी प्रसिद्ध असलेले इंदुरीकर अर्थात निवृती महाराज देशमुख यांनी आपल्या शैलीत कोरोनावर उपाय सांगितला आहे. कोरोनात हात धुणे, सॅनिटायझर आणि सुरक्षित अंतर ठेवण्याबरोबरच मन खंबीर ठेवणे हा आता रामबाण उपाय असल्याचे इंदुरीकर महाराज म्हणाले. लोणी येथे प्रवरा शिक्षण संस्थेच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या कोवीड केअर सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. नागरिकांना घाबरून न जाण्याचे आवाहन देखील त्यांनी केले.

किर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या हस्ते या कोविड सेंटरचे उद्घाटन करण्यात आले

मन खंबीर ठेवा -

राहाता तालुक्यातील लोणी येथे भाजपचे माजीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्यावतीने ४५० खाटांचे 'प्रवरा कोवीड सेंटर' सुरू करण्यात आले आहे. किर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या हस्ते या कोविड सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. सध्याचा काळ कठिण आहे. अशिक्षित असो किंवा शिक्षित प्रत्येकाने कोरोनाचा धसका घेतला आहे. त्यामुळे अनेकांना मृत्यू जवळ दिसतो. मात्र, मन खंबीर ठेवून परिस्थितीलाचा सामना केला पाहिजे, असे यावेळी बोलताना इंदुरीकर म्हणाले. आजपर्यंत देवाचे अनेक अवतार झाले आहे. मात्र, माणसातील माणुसकी दाखविण्यासाठी केरोनाला यावे लागले. तुमच्याबद्दल कोणाला किती आपलुकी आहे, हे समजण्यासाठी तुम्हाला पॉझिटिव्ह व्हावे लागतं, असेही ते म्हणाले.

मला कोरोना होणारच नाही असे म्हणण्यापेक्षा, मी मला कोरोना होवू देणार नाही, असा दृष्टीकोण ठेवणे गरजेचे आहे. मला अनेक उद्घाटनांना बोलवले जाते. त्यावेळी मी नेहमी बोलत असतो की आता असे आणखी व्यवसाय सुरू होतील. मात्र, कोरोना सेंटरच्या उद्घाटनानंतर मला येथे अ‌ॅडमीट होण्याची वेळ येवू नये म्हणजे झाले, अशा मिश्किल शब्दांत त्यांनी वातावरण हलके करण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा - दख्खनेतील महाराष्ट्र..! आयपीएस अधिकारी महेश भागवत यांच्या कार्याची तेलंगाणामध्ये छाप

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.