ETV Bharat / state

चंद्रयान 3 मोहीमेत भारताला यश; साईबाबा संस्थानकडून इस्रोच्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन

इस्रोची चंद्रयान 3 मोहीम यशस्वी झाल्याने भारतीयांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. देशभरातून इस्रोच्या शास्त्रज्ञांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. याच धर्तीवर अहमदनगर येथे श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डीच्या तदर्थ समितीच्या बैठकीत इस्त्रोच्या शास्त्रज्ञांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. यामध्ये साईबाबा संस्थानकडून इस्रोच्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन करण्यात आले.

Saibaba Sansthan On Chandrayaan 3
साईचरणी इस्त्रोचे शास्त्रज्ञ
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 23, 2023, 10:25 PM IST

अहमदनगर (शिर्डी) : चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चंद्रयान 3 यशस्वीपणे उतरवण्याचा मान भारताने अखेर पटकावला आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ यान उतरवणारा भारत जगातील पहिला देश ठरला. भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) शास्त्रज्ञांच्या कष्टाचं सोनं झालं आहे. बुधवारी (दि. २३ ऑगस्ट) अहमदनगर येथे श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डीच्या तदर्थ समितीच्या बैठकीत इस्रोच्या शास्त्रज्ञांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. यावेळी जिल्हा न्यायाधीश तथा तदर्थ समितीचे अध्यक्ष सुधाकर यरलगड्डा, जिल्हाधिकारी तथा समिती सदस्य सिध्दराम सालीमठ, संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा समिती सदस्य पी. शिवा शंकर व श्री साईबाबा संस्‍थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव आदी उपस्थित होते.

प्रोजेक्ट मॅनेजरनी घेतले होते साईबाबांचे दर्शन : यावेळी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. शिवा शंकर यांनी सांगितले की, चंद्रयान ३ च्या यशस्वी प्रक्षेपणापूर्वी १ जुलै रोजी चंद्रयान ३ चे प्रोजेक्ट मॅनेजर वीर मुथुवेल व असिस्टंट प्रोजेक्ट डायरेक्टर कल्पना यांनी साईबाबा समाधी मंदिरात येऊन साईबाबांचे दर्शन घेतले होते. चंद्रयान ३ चा नमुना श्री साई चरणी ठेऊन पूजा केली होती. साई संस्थानकडून यावेळी वीर मुथुवेल यांच्याकडे साईबाबांचा प्रसाद देऊन चंद्रयान ३ चे यशस्वी प्रक्षेपण होण्यासह त्याचे यशस्वी लँडिंग व्हावे, यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या होत्या.

चंद्रयान २ मोहिमेचे अपयश पुसले : भारतीय चंद्रयान यशस्वीपणे चंद्रावर उतरवण्याचा महत्त्वाचा टप्पा बुधवारी संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी पार पडला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ यान उतरवणारा भारत पहिला देश ठरला. चंद्रयान २ मोहिमेत अंतिम टप्प्यात आलेलं अपयश चंद्रयान ३ च्या माध्यमातून पुसून काढण्यात भारतीय शास्त्रज्ञांना यश आले. चंद्रयानाचं लँडिंग यशस्वी होणारच असा ठाम विश्वास भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) व्यक्त केला होता. तो खरा करून दाखवला आहे.

शेवटचे 800 मीटर महत्त्वाचे होते : यानाच्या लॅंडिगसाठी शेवटचे 800 मीटर खूप महत्त्वाचे होते. 2019 च्या चंद्रयान 2 मोहीमे दरम्यान चंद्राच्या 2.1 किलोमीटर अंतरापर्यंत पोहोचले होते; मात्र मॉड्यूलमधील समस्येमुळे ते फेल झाले होते. नुकतेच, रशियाचे लुना 25 हे अंतराळयान 20 ऑगस्टला चंद्रावर क्रॅश झाले होते. त्यामुळे भारताच्या या मिशनकडून सर्वांना फार अपेक्षा होत्या. आज त्या आता पूर्ण झाल्या आहेत.

हेही वाचा:

  1. भारताची 'चंद्रक्रांती'! Chandrayaan 3 चे चंद्रावर यशस्वी लॅंडिग
  2. 'नव्या भारताचे नवे उड्डाण', चांद्रयान 3 च्या यशस्वी लँडिंगनंतर पंतप्रधान मोदींनी केले देशाचे अभिनंदन
  3. Chandrayaan 3: संशोधनाच्या दृष्टिकोनातून पुढील 14 दिवस अत्यंत महत्त्वाचे- चारुदत्त पुल्लीवार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.