ETV Bharat / state

शिर्डीत साई भक्तांची गैरसोय; दर्शनासाठी लागतोय 4 ते 5 तासाचा कालावधी - Shirdi Sai devotees Inconvenience

आज सुट्टीनिमित्ताने शिर्डीत भाविकांची साई दर्शनासाठी मोठी गर्दी झाली असून, दर्शनाचे पास घेण्यासाठी भाविकांना चार ते पाच तास रांगेत उभे रहावे लागत आहे. साई संस्थानच्या वतीने भाविकांच्या सुविधेची कुठालीही व्यवस्था केली जात नसल्याचा आरोप भाविकांनी केला आहे.

Shirdi Sai devotees news
शिर्डी साई भक्त
author img

By

Published : Jan 17, 2021, 4:55 PM IST

अहमदनगर - आज सुट्टीनिमित्ताने शिर्डीत भाविकांची साई दर्शनासाठी मोठी गर्दी झाली असून, दर्शनाचे पास घेण्यासाठी भाविकांना चार ते पाच तास रांगेत उभे रहावे लागत आहे. साई संस्थानच्या वतीने भाविकांच्या सुविधेची कुठालीही व्यवस्था केली जात नसल्याचा आरोप भाविकांनी केला आहे.

प्रतिक्रिया देताना साई भक्त

हेही वाचा - अहमदनगर : कोविड लस घेतलेल्या तीन आरोग्य सेविकांना त्रास, आयसीयूमध्ये उपचार सुरू

दर्शनाला जाण्यासाठी भाविकांना बायोमेट्रिक पासेस घ्यावे लागतात. त्यासाठी काही ठिकाणी काऊंटर सुरू आहेत. साई संस्थानने तात्पुरत्या स्वरुपात श्रीराम पार्किंग परिसरात उभारलेल्या बायोमेट्रिक पासेस काऊंटरवर भाविकांनी पहाटेपासूनच मोठी गर्दी केली. मात्र, साई दर्शन पास घेण्यासाठी भाविकांना किमान चार ते पाच तास लागत आहे. तसेच, दर्शन पास काउंटर जवळ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने भाविकांकडून संस्थानविरोधात नाराजी व्यक्त केली जात आहे. गेल्या काही वर्षापासून साई संस्थानने भक्तांना बायोमेट्रिक पास घेण्याची सक्ती केली आहे. त्यामुळे, भाविकांना पास काढण्यासाठी काही तास थांबावे लागत आहे, नंतर पुन्हा दर्शन रांगेत उभे रहावे लागत असल्याने त्यांना त्रास सहन करावा लागत आहे.

हेही वाचा - १३ हजार १९४ उमेदवारांचे भवितव्य यंत्रात बंद, सरासरी ८२.७३ टक्के मतदान

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.