अहमदनगर - उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी आठ उमेदवारांनी अर्ज मागे आहेत. या लोकसभा निवडणुकीत शिर्डी मतदारसंघात २० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे ठाकले आहेत. यावेळी शिर्डीत पंचरंगी लढत पाहायला मिळणार असल्याचे बोलले जात आहे.
या २० उमेदवारांपैकी शिवसेनेचे सदाशिव किसन लोखंडे, काँग्रेसचे भाऊसाहेब मल्हारी, बन्सी भाऊराव सातपुतेंचा भारतीय कम्युनिस्ट पक्ष, संजय लक्ष्मण सुखदानचे वंचित बहुजन आघाडी, भाऊसाहेब राजाराम वाकचौरे या उमेदवारांमध्ये पंचरंगी लढत होणार असलेली पाहायला मिळणार आहे.
शिर्डी लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांमध्ये सदाशिव किसन लोखंडे (शिवसेना), कांबळे भाऊसाहेब मल्हारी (काँग्रेस), बन्सी भाऊराव सातपुते (भारतीय कम्युनिस्ट पार्टी), सुरेश एकनाथ जगधने (बहुजन समाज पार्टी), अशोक जगदीश जाधव (राष्ट्रीय मराठा पार्टी), प्रकाश कचरु आहेर (बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी), विजय ज्ञानोबा घाटे (रिपब्लिकन बहुजन सेना), संजय लक्ष्मण सुखदान (वंचित बहुजन आघाडी), डॉ. अमोलिक गोविंद बाबुराव (अपक्ष), अशोक अनाजी वाकचौरे (अपक्ष), किशोर लिंबाजी रोकडे (अपक्ष), गणपत मच्छिंद्र मोरे (अपक्ष), प्रदिप सुनिल सरोदे (अपक्ष), बापू पाराजी रणधीर (अपक्ष), बोरगे शंकर हरिभाऊ (अपक्ष), भाऊसाहेब जयराम वाकचौरे (अपक्ष), भाऊसाहेब राजाराम वाकचौरे (अपक्ष), सचिन सदाशिव गवांदे (अपक्ष), सुभाष दादा त्रिभुवन (अपक्ष), संपत खंडू समिंदर (अपक्ष) हे २० उमेदवार निवडणुकीचा रिगणात उतरले आहेत.
डॉ. अरुण प्रभाकर साबळे (अपक्ष), क्रांती अरुण साबळे (अपक्ष), गायकवाड अशोक रामचंद्र (अपक्ष), बागूल भुमिका आशिष (अपक्ष), राजेंद्र रत्नाकर वाघमारे (अपक्ष), प्रकाश गुलाब वाघमारे (अपक्ष), सदाशिव रामचंद्र वाकचौरे (अपक्ष), सरोदे अंबादास लक्ष्मण (अपक्ष) यांनी शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज माघारी घेतला आहे. तसेच १० एप्रिल, २०१९ रोजी झालेल्या छाननीमध्ये एकूण २८ अर्ज वैध ठरविण्यात आले होते.