अहमदनगर - शेवगाव नगरपरिषदेच्या सफाई कर्मचाऱ्यांना गेल्या चार महिन्यांपासून वेतन मिळालेलं नाहीये. पगार झाल्यास दिवाळीच्या सणासाठी पैसे मिळतील या आशेने त्यांनी कोरोनाच्या काळात देखील जीवाची परवा न करता सेवा दिली. मात्र अजूनही त्यांना पैसे न मिळाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे पगाराच्या मागणीसाठी सोमवारपासून या कर्मचाऱ्यांनी बेमुदत उपोषणाला सुरूवात केली आहे.
सफाई कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेने देखील पाठिंबा दिला आहे. प्रशासनाने सफाई कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन त्वरित द्यावे. अन्यथा चक्काजाम आंदोलन करू, असा इशारा स्वाभिमानीच्या वतीने देण्यात आला आहे. बोनस तर नाहीच मिळाले मात्र, आात पगार मिळाला नाही तर मुख्य अधिकाऱ्याच्या घरी जाऊन दिवाळी साजरी करू, असा इशारा स्वाभिमानीचे तालुका अध्यक्ष प्रशांत भराट यांनी दिला आहे. या आंदोलनाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष प्रशांत भराट, सरचिटणीस बाळासाहेब फटांगडे, शहराध्यक्ष भाऊ बैरागी यांच्यासह सफाई कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
हेही वाचा - आघाडीतील बिघाडीमुळे भाजपचा विजय निश्चित; शिरीष बोराळकरांना विश्वास
हेही वाचा - औरंगाबादेत शस्त्र विक्रीसाठी आलेल्या तिघांना अटक, दोन पिस्टलसह जिवंत काडतुसे जप्त